शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा ठरला फॉर्म्युला! ग्रामविकासने काढला ‘हा’ आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा ठरला फॉर्म्युला! ग्रामविकासने काढला ‘हा’ आदेश

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा ठरला फॉर्म्युला! ग्रामविकासने काढला ‘हा’ आदेश

सोलापूर : जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया आता काही दिवसांत सुरु होणार आहे. यंदा प्रथमच ही बदली प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. त्याचे काम मे.विन्सीस या स्वॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आले आहे. स्वॉफ्टवेअर तयार झाले असून आता डमी प्रयोग करून बदल्यांची प्रक्रिया सुरु होणार आहे. पण, शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाने एक आदेश काढला आहे. त्यानुसार ज्या जिल्हा परिषदांमधील शिक्षकांची रिक्त पदे १० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत, त्यांच्यासह दहा टक्क्यांपेक्षा अधिक रिक्तपदे असलेल्या जिल्हा परिषदांनाही आंतरजिल्हा बदलीत सहभागी करून घेतले जाणार आहे.

हेही वाचा: सरकारमध्ये २.७२ लाख पदे रिक्त! दोन टप्प्यात होणार मेगाभरती

शिक्षकांची आंतरजिल्हा प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविली जात आहे. दरम्यान, ज्या जिल्हा परिषदांमधील शिक्षकांची रिक्त पदे १० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत, त्यांना आंतरजिल्हा बदल्यांमध्ये सहभागी करून घेतले जात नव्हते. तरीदेखील, तेथील शिक्षकांनी अर्ज केल्यास निकषांनुसार ते अपात्र ठरत होते. नवीन शिक्षक भरती नाही, रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमधील शिक्षकांना बदलीच मिळालेली नाही. जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर तेथील बदली झालेल्या शिक्षकांना अन्य जिल्हा परिषदांमध्ये बदलीने कार्यमुक्त करणे शक्य होणार आहे. शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने ग्रामविकास विभागाला निवेदन देण्यात आले होते. त्यामुळे आता दहा टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त असली, तरीदेखील सर्व जिल्हा परिषदांना ऑनलाइन आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे. पण, आंतरजिल्हा बदली किंवा नवीन शिक्षक भरतीनंतर संबंधित जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या दहा टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास तेथील शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीतून त्यांना हव्या असलेल्या जिल्ह्यात जाता येणार आहे.

हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला

  • ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार...
    - जुन्या निकषांनुसार १० टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त असलेल्या जिल्हा परिषदांना आंतरजिल्हा बदलीत सहभागी होता येत नव्हते
    - आंतरजिल्हा बदलीसाठी संबंधित जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या रिक्त जागांची टक्केवारी १० टक्क्यांपेक्षा कमी असावी
    - बदल्यांच्या माध्यमातून ही टक्केवारी निकषांनुसार दहा टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास तेथील शिक्षकांना कार्यमुक्त करून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येईल
    - मे.विन्सीस सॉफ्टवेअर कंपनीने २०२२ मधील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या ऑनलाईनमध्ये सर्व जिल्ह्यांचा समावेश करावा

Web Title: The Formula For Teacher Transfers Order Issued By Rural

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top