Bhagat singh Koshyari: राज्यपालांना आधी महाराष्ट्राबाहेर हाकला; संभाजीराजे कोश्यारींवर भडकले

राज्यपाल असं का बडतात मला माहीत नाही त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या
Sambhaji Raje Bhosle
Sambhaji Raje Bhosle Esakal

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मागच्या काही काळापासून वादग्रस्त विधानं करत आहेत. विशेषतः महापुरुषांबद्दल बोलतांना त्यांची जीभ घसरलेली आहे. आज औरंगाबाद येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. यासंदर्भात माजी खासदार संभाजी छत्रपती यांनीही राज्यपालांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना केली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या या विधानावर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहेत. दरम्यान राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया छत्रपती संभाजी यांनी व्यक्त केली आहे.

Sambhaji Raje Bhosle
Savarkar controversy: ‘ती’ पत्रे खरी पण...; सावरकरांच्या वंशजाच्या दाव्यामुळे भाजपसह मनसे, शिंदे गटाची कोंडी?

पुढे बोलताना छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, राज्यपाल असं का बडतात मला माहीत नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या, असं मी परवा सुद्धा म्हटलं होतं. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, प्लीज प्लीज अशी व्यक्ती महाराष्ट्रात नको आहे आम्हाला शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात? अशा शब्दात छत्रपती संभाजी यांनी संताप व्यक्त केला आहे.

Sambhaji Raje Bhosle
Bhagatsingh Koshyari: गडकरींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी, राज्यपालांची जीभ पुन्हा घसरली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com