आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात पुन्हा लॉकडाउन होणार नाहीच! | Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात पुन्हा लॉकडाउन होणार नाहीच!

आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात पुन्हा लॉकडाउन होणार नाहीच!

सोलापूर : राज्यात 1 ते 15 जानेवारीपर्यंत सव्वाचार लाख नवीन कोरोना (Covid-19) रुग्ण आढळले असून, या काळात अडीच लाख सक्रिय रुग्ण वाढले आहेत. त्यातील जवळपास 85 टक्‍के रुग्ण घरीच उपचार घेत असून रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी सद्य:स्थतीत केवळ दीडशे मेट्रिक टनापर्यंतच ऑक्‍सिजन (Oxygen) लागत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन (Lockdown) होणारच नाही, सर्वांनी लॉकडाउनचा विषय डोक्‍यातून काढून टाकावा, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले. (The health minister said there would be no more lockdowns in the state)

हेही वाचा: बुडणाऱ्याने मिठी मारली अन्‌ त्याच्यासह पट्टीचा पोहणाराही बुडाला!

जगभर ओमिक्रॉनचा (Omicron) विळखा वाढत असूनही महाराष्ट्रात (Maharashtra) 2 डिसेंबरपासून 14 जानेवारीपर्यंत ओमिक्रॉनचे एक हजार 367 रुग्ण आढळले आहेत. त्यातील जवळपास आठशे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दुसरीकडे राज्यातील 35 जिल्ह्यांपैकी सद्यस्थितीत मुंबई (Mumbai), रायगड (Raigad), नाशिक (Nashik), नगर (Nagar), पुणे (Pune), सातारा (Satara), औरंगाबाद (Aurangabad), नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांमध्येच रुग्णवाढ मोठी आहे. सोलापूर (Solapur), कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), बीड (Beed), लातूर (Latur) या जिल्ह्यांमध्येही आता रुग्ण वाढू लागले असून ग्रामीणच्या तुलनेत शहरात रुग्णवाढ अधिक आहे. तरीही, प्रतिबंधित लसीकरणामुळे बहुतेक रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे नाहीत. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एक किंवा दोन डोस घेतलेलेच सर्वाधिक आहेत. त्यांना ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर्सची गरज भासलेली नाही. सध्या राज्यातील अडीच लाख सक्रिय रुग्णांपैकी जवळपास 13 टक्‍के रुग्णांनाच ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर्स लागल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने (Health Department) नोंदविले आहे. या पार्श्‍वभूमीवर 31 जानेवारीपर्यंत 15 वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण होईल, असा कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या ओहत. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन होणार नाही, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. सध्या जे निर्बंध लागू केलेत, त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, गर्दी होईल असे कृत्य कोणीही करू नये, नियमांचे तंतोतंत पालन करावे, प्रतिबंधित लस (Covid Vaccine) घेऊन सर्वांनी सुरक्षित व्हावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

राज्यातील ऑक्‍सिजनची सद्य:स्थिती...

  • दररोज ऑक्‍सिजन निर्मिती : 900 मे. टन

  • मेडिकलसाठी ऑक्‍सिजन : 338 मे.टन

  • कोरोना रुग्णांसाठी ऑक्‍सिजन : 150 मे.टन

  • नॉनकोविड रुग्णांसाठी ऑक्‍सिजन : 188 मे.टन

हेही वाचा: RBI मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची भरती! 15 जानेवारीपासून करा अर्ज

मेडिकलसाठी लागणाऱ्या एकूण ऑक्‍सिजनपैकी राज्यातील कोरोना रुग्णांसाठी दीडशे मे. टनापर्यंतच ऑक्‍सिजन लागत आहे. मागील दोन्ही लाटांप्रमाणे स्थिती नसल्याने लॉकडाउन होणार नाही, हे निश्‍चित. आपल्याकडे रुग्णालयातील खाटा, ऑक्‍सिजन, औषधसाठा, डॉक्‍टर्स, कर्मचारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.

- राजेश टोपे, आरोग्यमंत्री

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top