बुडणाऱ्याने मिठी मारली अन्‌ त्याच्यासह पट्टीचा पोहणाराही उजनी धरणात बुडाला! | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुडणाऱ्याने मिठी मारल्याने त्याच्यासह पट्टीचा पोहणाराही उजनी धरणात बुडाला!
बुडणाऱ्याने मिठी मारली अन्‌ त्याच्यासह पट्टीचा पोहणाराही उजनी धरणात बुडाला!

बुडणाऱ्याने मिठी मारली अन्‌ त्याच्यासह पट्टीचा पोहणाराही बुडाला!

चिखलठाण (सोलापूर) : चिखलठाण (ता. करमाळा) (Karmala) येथे उजनी धरणात (Ujani Dam) फिरण्यासाठी गेलेल्या मुंबई (Mumbai) येथील युवकासह एक मच्छिमार (Fisherman) असे दोघे बुडाले. शुक्रवारी (ता. 14) सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. गावातील तरुण व मच्छीमारांनी शोध मोहीम सुरू केली आहे. ऐन संक्रांत सणादिवशी (Sankranti Festival) ही दुर्घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची खबर मिळताच पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून, स्थानिक ग्रामस्थ व मच्छिमारांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. (The two youths who were going on a boat drowned in Ujani dam)

हेही वाचा: रंगीबेरंगी पतंग, फळभाज्या-फुलांनी सजले विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर

चिखलठाण (ता. करमाळा) येथे उजनी धरणात फिरण्यासाठी गेलेल्या मुंबई येथील युवकाचा होडीतून तोल गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मच्छीमार तरुणाने उडी मारली. बुडणाऱ्याने मच्छीमाराला मिठी मारल्याने दोघेही बुडाले. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली आहे. येथील समीर याकूब सय्यद (वय 29) हा उजनी धरणात मासेमारीचा व्यवसाय करतो. त्याच्याकडे मुंबई येथील पाहुणे आले होते. सकाळी नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी उजनी धरणात निघाले असताना मुंबई येथील चार पाहुणे त्याच्यासोबत फेरफटका मारण्यासाठी गेले. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास धरणातील पाण्यात फेरफटका मारताना अल्ताफ इकबाल शेख (वय 18, रा. मुंबई) या युवकाचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी समीर याने पाण्यात उडी मारली. समीर मासेमारी करणारा पट्टीचा पोहणारा होता; मात्र अल्ताफने त्याला मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले. होडीतील इतरांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूला मारेमारी करणारे मच्छीमार आले. तोपर्यंत दोघे बुडाले होते. मच्छीमारांना शोध सुरू केला आहे.

हेही वाचा: ZP आरोग्य विभागातील 7 तर 'सिव्हिल'मधील 46 कर्मचारी कोरानाबाधित

घटनास्थळ गावापासून जवळच असल्याने गावातील लोक मोठ्या प्रमाणावर जमले. या परिसरातील दहीगाव (Dahigaon), चिखलठाण (Chikhalthan), केडगाव (Kedgaon), कुगाव (Kugaon) परिसरातील मच्छीमार येऊन वडापच्या मदतीने त्यांचा शोध घेत आहेत; परंतु त्यांना यश आले नाही. तरीही गावातील तरुण व मच्छीमारांनी शोध सुरूच ठेवला आहे. ऐन संक्रांत सणादिवशी ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची खबर मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, स्थानिक ग्रामस्थ व मच्छीमारांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.

बातमीदार : गजेंद्र पोळ

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top