कोरोनानं मृत्यु झालेल्या 'एसटी' कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची मदत

निकषात न बसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना एसटीनं हा दिलासा दिला आहे.
ST
STe sakal

मुंबई : कोरोनामुळं मृत्यू झालेल्या पण अत्यावश्यक सेवेच्या निकषांत न बसणाऱ्या एसटी (ST) कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी बिरूदावली मिरवणारी आणि ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेली लालपरी अर्थात एसटीनं ७४ व्या वर्षात पदार्पण केलं. १ जून रोजी एसटीचा ७३ वा वर्धापनदिन पार पडला. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांनी ही महत्वाची घोषणा केली. (The heirs of ST employees who died in Corona will get Rs 5 lakh assistance)

ST
दिलासा! कोरोनाचा भारतातील एकच व्हेरिअंट काळजी वाढवणारा - WHO

याबाबत माहिती देताना परब म्हणाले, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० लाख रूपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. सरकारची ही योजना गेल्यावर्षी महामंडळाच्या वर्धापनदिनी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीही लागू केली होती. या योजनेची मुदत ३० डिसेंबरपर्यंत होती. मात्र, शासनाने या योजनेचा कालावधी नंतर ३० जूनपर्यंत वाढवला. परंतु, राज्य परिवहन महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या योजनेचा कालावधी वाढवला नव्हता. त्यामुळे वर्धापनदिनाचे औचित्य साधत परब यांनी हा कालावधी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ३० जून २०२१ पर्यंत वाढवला असल्याचं घोषित केलं. मात्र, कोरोनामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे, जे निकषात बसत असतील त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमांप्रमाणे मदत दिली जाईल. मात्र, कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, परंतु जे शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देण्यात येणार आहे.

ST
ब्रिटनमध्ये जूलैनंतर पहिल्यांदाच एकही मृत्यू नाही

कोरोनामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाली आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसला असून महामंडळाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत, असे सांगतानाच महामंडळासमोर कितीही अडचणी आल्या तरी एकाही कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागणार नाही, अशा शब्दांत परब यांनी कामगारांना आश्वस्त केलं. सध्या एसटी प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करत असली तरी येत्या काही वर्षांमध्ये एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना हाती घेतल्या जातील, असंही परब यांनी सांगितलं.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना सहा महिन्यांत नोकरी

कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी कोरोना वॉरियर्स म्हणून एसटीचा कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरला होता. मात्र, एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊन त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोना किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना येत्या सहा महिन्यांमध्ये अनुकंपातत्वावर सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देशही यावेळी परिवहन मंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

महाकार्गोच्या चालकांना १५० रूपये भत्ता

कोरोना काळात गेल्यावर्षी एसटी महामंडळाने व्यावसायिक मालवाहतूक क्षेत्रात दमदारपणे पदार्पण केले. खासगी वाहतूकीच्या तुलनेत किफायतशीर दर असल्याने एसटीची ’महाकार्गो’ ही मालवाहतूक सेवा उपयुक्त ठरू लागली आहे. मालवाहतूक करताना चालकांना अनेकदा परगावी जावे लागते. तेथे त्यांना अनेकदा मुक्काम करावा लागतो. अशावेळी त्यांना पदरमोड करून आपला खर्च भागवावा लागतो. त्यामुळे अशा चालकांना परगावी मुक्काम करावा लागल्यास त्यांना सरसकट १५० रूपये प्रतिदिन भत्ता देण्याची घोषणा परब यांनी केली. त्यामुळे या चालकांची ओढाताण होणार नाही, याची काळजी महामंडळ आजपासून घेणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

एसटी महामंडळानं सुरु केलेल्या नव्या सोयी-सुविधा

  1. एसटीच्या प्रवाशांसाठी स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं यासाठी राज्यातील तालुक्यांना जोडली जाणाऱ्या काही १०० प्रमुख स्थानकांवर लवकरच आरओच्या माध्यमातून स्वच्छ पाणी देण्यात येणार आहे.

  2. एसटी स्थानकांवर मोठी स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. या स्वच्‍छतागृहांच्या स्वच्छतेसाठी थोडासा दर आकारून लोकांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात येतील. त्यादृष्टीकोनातून येत्या काही दिवसांत योजना आणली जाणार आहे तसेच बसस्थानकांचा परिसरही स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.

  3. प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य शासनाने नवीन बसगाड्या घेण्यासाठी भरीव तरतूद केली आहे. येणाऱ्या काळात जवळपास अडीच हजार गाड्या घेणार आहोत. यामध्ये पर्यावरवणपूरक इलेक्ट्रीक बस, एलएनजी, सीएनजी, साध्या तसेच आराम गाड्यांचा समावेश असेल.

  4. राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध केलेल्या योजना, सेवा तसेच महामंडळाची विविध माहिती अधिकाधिक प्रवाशांपर्यत पोहोचवण्यासाठी एसटीने आपले स्वतःचे ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम व टेलीग्राम या समाजमाध्यमांवर आपले अधिकृत खाते उघडले आहे. ॲड. परब यांच्या हस्ते एसटीच्या फेसबुक, इन्स्टाग्राम व टेलग्राम या समाजमाध्यमांचा शुभारंभ केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com