मृत डॉ. शिरीष वळसंगकरांचे मृत्यूपत्र समोर! मृत्यूपत्र अन्‌ रुग्णालयाच्या भागीदारीची कागदपत्रे सादर करा, डॉ. उमा यांच्या अर्जावर डॉ. शोनालींच्या वकिलांची मागणी न्यायालयात मान्य, वाचा...

सोलापुरातील रामवाडी परिसरातील ‘एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एलएलपी’शी सून डॉ. शोनाली व तिच्या आई-वडिलांचा काहीही संबंध नाही. तरीदेखील, त्यांच्याकडून त्रास दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. उमा यांनी या सर्वांना ‘निरंतर ताकीद’ (कायमस्वरूपी मनाईहुकूम मिळणेबाबत) द्यावी म्हणून दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर आज (शुक्रवारी) सुनावणी झाली. यावेळी डॉ. शोनालींच्या वकिलांनी मृत डॉ. शिरीष यांचे मृत्यूपत्र व ‘एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एलएलपी’च्या भागीदारीची (एलएलपी) कागदपत्रे न्यायालयात सादर करावीत, अशी मागणी केली.
Dr. Shirish Valsangkar

Dr. Shirish Valsangkar

Sakal
Updated on

सोलापूर : सोलापुरातील रामवाडी परिसरातील ‘एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एलएलपी’शी सून डॉ. शोनाली व तिच्या आई-वडिलांचा काहीही संबंध नाही. तरीदेखील, त्यांच्याकडून त्रास दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. उमा यांनी या सर्वांना ‘निरंतर ताकीद’ (कायमस्वरूपी मनाईहुकूम मिळणेबाबत) द्यावी म्हणून दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर आज (शुक्रवारी) सुनावणी झाली. यावेळी डॉ. शोनालींच्या वकिलांनी मृत डॉ. शिरीष यांचे मृत्यूपत्र व ‘एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एलएलपी’च्या भागीदारीची (एलएलपी) कागदपत्रे न्यायालयात सादर करावीत, अशी मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली असून पुढील सुनावणी आता १ ऑगस्टला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मृत डॉ. शिरीष यांच्या पत्नी डॉ. उमा यांनी दाखल केलेल्या दाव्यानुसार ईरण्णा वस्तीतील (रामवाडी) ५५,००० चौरस फुटाची व्यापारी इमारत माझ्या व दिवंगत पती डॉ. शिरीष यांच्या संयुक्त मालकीची होती. डॉ. शिरीष यांनी १७ ऑगस्ट २०२० रोजी केलेल्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या निधनानंतर पत्नी म्हणून मालमत्तेचा ताबा माझ्याकडे आला. सध्या ‘एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ भाडेपट्ट्याने चालवले जाते. ज्यात डॉ. उमा यांच्यासह मुलगी नेहा फडके व जावई डॉ. सुजय फडके भागीदार आहेत. यात प्रतिवादी डॉ. शोनाली, डॉ. दिलीप जोशी यांचा हॉस्पिटलशी कोणताही कायदेशीर संबंध नाही. ती कधीही हॉस्पिटलचा भाग नव्हती. हॉस्पिटलमध्ये कधीही डॉक्टर, स्टाफ नव्हत्या.

त्यामुळे ‘एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एलएलपी’शी त्यांचा कोणताही संबंध नाही. तरी, त्यांनी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरील डॉक्टर्स, कर्मचारी, भागीदारांच्या आराम व निवासाच्या ठिकाणी बेकायदा प्रवेश केला. तिथे आरडाओरडा करून, असभ्य भाषा वापरून रुग्णालय व्यवस्थापनात अडथळा आणला. डॉ. शोनाली व इतरांकडून मालमत्तेच्या शांततामय उपभोगात आणि हॉस्पिटलच्या कामकाजात वारंवार अडथळा निर्माण केला जात आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना रुग्णालयाच्या जागेत बेकायदेशीर प्रवेश करण्यास आणि अडथळा आणण्यास कायमची मनाई (ताकीद) करावी, अशी विनंती या दाव्याद्वारे डॉ. उमा यांनी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे.

डॉ. उमा यांचा दावा असा...

मृत डॉ. शिरीष यांच्या पत्नी डॉ. उमा यांनी दाखल केलेल्या दाव्यानुसार ईरण्णा वस्तीतील (रामवाडी) ५५,००० चौरस फुटाची व्यापारी इमारत माझ्या व दिवंगत पती डॉ. शिरीष यांच्या संयुक्त मालकीची होती. डॉ. शिरीष यांनी १७ ऑगस्ट २०२० रोजी केलेल्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या निधनानंतर पत्नी म्हणून मालमत्तेचा ताबा माझ्याकडे आला. सध्या ‘एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ भाडेपट्ट्याने चालवले जाते. ज्यात डॉ. उमा यांच्यासह मुलगी नेहा फडके व जावई डॉ. सुजय फडके भागीदार आहेत. यात प्रतिवादी डॉ. शोनाली, डॉ. दिलीप जोशी यांचा हॉस्पिटलशी कोणताही कायदेशीर संबंध नाही. ती कधीही हॉस्पिटलचा भाग नव्हती. हॉस्पिटलमध्ये कधीही डॉक्टर, स्टाफ नव्हत्या. त्यामुळे ‘एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एलएलपी’शी त्यांचा कोणताही संबंध नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Accused Manisha being brought to court in connection with the Dr. Shirish Valsangkar case
Dr. Valsangkar suicide case
solapur city
Dr. Shirish Valsangkar family's
Marathi News Esakal
www.esakal.com