arvind sawant
arvind sawant

खोटारड्या लोकांचा खोटेपणा समोर आणला पाहिजे; अरविंद सावंत यांची 'होऊ दे चर्चा'वेळी टीका

Published on

मुंबई - देशात इंडिया आघाडी स्थापन झाल्यापासून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. त्यातच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. 'होऊ दे चर्चा' या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

arvind sawant
Chandrayaan 3 Mission Song: भाजपानं गाण्यात मांडला चांद्रयान-3 मोहिमेचा प्रवास, VIDEO पाहा...

अरविंद सावंत म्हणाले की, होऊ दे चर्चा हा उद्धव ठाकरेंनी विषय मला दिला. हा विषय तळागलळाला गेला पाहिजे. खोटारड्या लोकांचा खोटेपणा समोर आणला पाहिजे. लोकशाही खड्ड्यात घालायचा प्रयत्न सुरू आहे.. यासाठी ही गोष्ट सुरू केली आहे.

मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे...महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विषयांवरती बोलतोय.. महाराष्ट्रवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोलतोय...शेतकरी उध्वस्त होतय...त्याला धोरण नाही...हे लोकांच्या नजरेला आणावं लागेल, असही सावंत म्हणाले.

arvind sawant
Maharashtra Fourth Women Policy : महाराष्ट्रात चौथं महिला धोरण येणार; अजित पवारांची घोषणा

कांदा प्रश्नावर सावंत म्हणाले की, केंद्राने निवडणुकीत सांगितलं होतं, हमीभाव देऊ. पण काय झालं? कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. पण आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला गेला. १०० हून अधिक शेतकरी मरण पावले. त्यानंतर लाज वाटल्याने माफी मागावी लागली. हे विसरू नको. शेतकऱ्यांना उद्वस्त करणारे आणि उद्योगांची भरभराट करणारे कायदे करण्यात येत असल्याचं सावंत यांनी नमूद केलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमध्ये मिळालेल्या मानद डॉक्टरेटबाबत सावंत म्हणाले की, त्यांना आणखी दोन चार मानद देऊन टायकायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com