Maharashtra Politics: मुंबईत ठाकरे गटामुळे वाढले भाजपचे टेंशन; वाचा नक्की काय आहे प्रकरण?

Maharashtra Politics: मुंबईत ठाकरे गटामुळे वाढले भाजपचे टेंशन; वाचा नक्की काय आहे प्रकरण?
Updated on

Mumbai Lokshabha : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आजपासून पाटील यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघात उमेदवार जाहीर करून दंड थोपटले आहेत.


शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाच्या विभागवार बैठका आणि मेळावे होऊ लागले आहेत. त्यासाठी विभाग प्रमुखांवर जबाबदारी सोपविली आहे. निवडणूक कधीही होईल, त्यामुळे कामाला लागा, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Maharashtra Politics: मुंबईत ठाकरे गटामुळे वाढले भाजपचे टेंशन; वाचा नक्की काय आहे प्रकरण?
Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट आमने-सामने; अजित पवार गटाने मागितली मुदतवाढ

महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले नसले तरी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आमचा आग्रह राहील, त्यांना निवडणुकीत उतरविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Maharashtra Politics: मुंबईत ठाकरे गटामुळे वाढले भाजपचे टेंशन; वाचा नक्की काय आहे प्रकरण?
Maharashtra Politics : आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीला सुरुवात; 34 याचिकांचं सहा गटांमध्ये वर्गीकरण

संजय दिना पाटील हे २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन लाख १३ हजार ५०५ मते मिळवून विजयी झाले होते. तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. आता ते शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहेत. भाजपचे किरीट सोमय्या यांना दुसऱ्या क्रमांकाची दोन लाख १० हजार ५७२ मते मिळाली होती.

Maharashtra Politics: मुंबईत ठाकरे गटामुळे वाढले भाजपचे टेंशन; वाचा नक्की काय आहे प्रकरण?
Maharashtra Politics : चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या पवारांनी राज्यासाठी काय केलं? राजन तेलींचा सुप्रिया सुळेंना सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com