मागच्या जन्मात पाप केलेला माणूस साखर कारखाना काढतो किंवा... - गडकरी | Nitin gadkari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

मागच्या जन्मात पाप केलेला माणूस साखर कारखाना काढतो किंवा... - गडकरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तेसवा

- सुशांत सावंत

मुंबई: "राज्यातल्या सहकार चळवळीचे मूल्यमापन करायचे असेल, तर ग्रामीण भागातील जनतेवर काय परिणाम झाला याचे मापन केले तर याचे आपण महत्व समजू शकतो" असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) म्हणाले. ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 110 वर्ष पूर्ण होत असून, त्या निमित्तानं शतकोत्तर दशपूर्ती सोहळा कार्यक्रमात बोलत होते. "आपल्या देशात 8 ते 12 टक्के योगदान शेतीवर ग्रोथ रेट आहे ही देशातली खरी शोकांतिका आहे" असे गडकरी म्हणाले.

"देशाच्या ग्रोथमध्ये जे उद्दिष्ट गाठायला हवे ते त्याचमुळे गाठता येत नाही. सहकारी क्षेत्रामुळे ग्रोथ रेट वाढू शकतो" असे गडकरी म्हणाले. "आज कोल्हापूरमध्ये सहकारी साखर कारखाने असल्याने तिथे ग्रोथ रेट चांगला आहे. मी, जेव्हा पुणे जिल्ह्यातून कोल्हापुरमध्ये जातो. तेव्हा तिथले चित्र वेगळे आहे आणि विदर्भातील चित्र वेगळे असल्याचे जाणवले"

हेही वाचा: क्रौर्याचा कळस! मुंबईत भररस्त्यात प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या

"कोल्हापूरमध्ये सहकारी साखर कारखाने असल्याने निश्चितच तिथला ग्रोथ रेट चांगला आहे" असे गडकरी यांनी सांगितले. "तुम्ही सगळे नशीबवान आहात की, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाना काढला आणि मी विदर्भात काढला. खूप वाईट परिस्थितीतून जावे लागले. मागच्या जन्मात पाप केलेला माणूस एकतर साखर कारखाना काढतो किंवा वर्तमान पत्र काढतो" असे गडकरी म्हणाले.

loading image
go to top