क्रौर्याचा कळस! मुंबईत भररस्त्यात प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

क्रौर्याचा कळस! मुंबईत भररस्त्यात प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या

मुंबई: मुंबईत भररस्त्यात तरुणीची चाकूने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली. चेंबूरमध्ये (Chembur) बुधवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. वाशी नाका (Vashi naka) येथे राहणाऱ्या आकांक्षा सुरेश खरटमोल या २१ वर्षीय तरुणीची भररस्त्यात प्रियकराने चाकूने भोसकून हत्या केली. पोलिसांनी (Police) आरोपी अक्षय आठवलेला (२४) अटक केली आहे. आकांक्षाचं अक्षय बरोबर लग्न झालं होतं. पोलिसांनी अक्षय विरोधात आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्याखाली गुन्हा नोंदवला आहे.

२०१९ मध्ये वांद्रे कोर्टाबाहेर आकांक्षा आणि अक्षयचं लग्न झालं होतं. पण काही महिन्यातच त्यांच्यात वाद सुरु झाले. अखेर आकांक्षा तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली. अक्षय लोअर परेल येथीस सर्जिकलच्या दुकानात नोकरीला होता. आकांक्षाने आयुष्यात पुन्हा यावं, यासाठी अक्षय प्रयत्न करत होता. वैवाहिक जीवनात वाद असले, तरी आमच्या प्रेमसंबंध कायम होते, असा दावा अक्षयने केला आहे. द फ्रि प्रेस जर्नलने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: पाकिस्तानच्या माजी सैनिकाचा भारतात पद्म श्री पुरस्काराने सन्मान

आकांक्षा धारावी येथील रुग्णालयात रिसेप्शनिस्टची नोकरी करत होती. ती रिक्षामधून आपल्या नोकरीच्या ठिकाणी चालली होती. अक्षय बाईकवरुन तिचा पाठलाग करत होता. चेंबूर राहुल नगर येथे त्याने आकांक्षाची रिक्षा थांबवली. तिथे दोघांमध्ये वाद झाला. चिडलेल्या आकाशने चाकू काढला व आकांक्षावर सपासप वार केले.

हेही वाचा: निलोफर मलिकने देवेंद्र फडणवीसांना पाठवली नोटीस

गंभीर जखमी झालेली आकांक्षा रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गुन्हा केल्यानंतर अक्षय तिथून निसटला नाही. आरसीएफ पोलिसांनी त्याला अटक केली. आज त्याला कोर्टात हजर करण्यात येईल.

loading image
go to top