सोलापूर : कंदलगाव (ता. द. सोलापूर) येथील पुष्पक ऑर्केस्ट्रा बारवर ३१ डिसेंबरच्या पहाटे दोन वाजता पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. तेथील ७१ जणांविरुद्ध मंद्रूप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तेथून ५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री मंद्रूप पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कंदलगावजवळील पुष्पक ऑर्केस्ट्रा बारमधील बारबाला तोकडे कपडे घालून बीभत्सपणे अश्लील नृत्य करीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी बारबाला अश्लील नृत्य करीत होत्या. ग्राहकांकडे पाहून अश्लील हावभाव करीत होत्या. डीजेच्या तालावर ग्राहक देखील नाचत होते. काहीजण स्टेजसमोर तर काहीजण सोफ्यावर बसले होते. नोटासदृश कुपन्स त्या महिलांवर उधळत होते.
सहायक पोलिस अधीक्षक राहुल अतराम, पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्यासह मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार व पोलिस अंमलदारांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेथील साउंड सिस्टिम, रोकड, वाहने, मोबाईल असा एकूण ५६ लाख एक हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय १२ बारबाला, एका गायिकेसह ५० ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ऑर्केस्ट्रा बार मालक रोहित पांडुरंग चव्हाण (रा. सोलापूर) व चालक भारत राजाराम तांबे (रा. शिवाजीनगर, बाळे) यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. चालकाला ताब्यात घेतले असून, मालकाचा शोध सुरू आहे.
रोखीने नव्हे आता स्कॅनरवर पैसे
पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकला. त्यावेळी तब्बल ५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात रोकड खूप कमी आहे. त्याचे कारण म्हणजे, बहुतेक ग्राहकांनी तेथील स्कॅनरद्वारे ऑनलाइन पैसे पाठविल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने मंद्रूप पोलिसांचा तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.