मोठी बातमी! सोलापूरची लोकसंख्या अर्ध्या कोटीवर; शासकीय योजना अन्‌ बजेट तेवढेच; विमानसेवा नाही, उद्योगातही वाढ नाही; तरुणांच्या स्थलांतरात वाढ

२०११मध्ये सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४३ लाख १७ हजारांवर होती. आता १२ वर्षांनी त्यात वाढ होऊन जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे ५१ लाखांवर पोचली आहे. पण, शासकीय योजना अन्‌ योजनांचे बजेट तेवढेच, लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगारात वाढ नाही.
solapur
solapursakal

सोलापूर : प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना अपेक्षित असतानाही २०११ नंतर लोकसंख्येचे मोजमाप झालेले नाही. २०११मध्ये सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४३ लाख १७ हजारांवर होती. आता १२ वर्षांनी त्यात वाढ होऊन जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे ५१ लाखांवर पोचली आहे. पण, शासकीय योजना अन्‌ योजनांचे बजेट तेवढेच, लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगारात वाढ नाही. पोलिस ठाण्यांची संख्या व मनुष्यबळ ‘जैसे थे’च असल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर स्थलांतर विशेषतः तरुण परजिल्ह्यात जात असल्याचे चित्र आहे.

सोलापूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत १८ ते २९ वयोगटातील तरुणांची संख्या तब्बल साडेअकरा लाखांपर्यंत आहे. दरवर्षी जिल्ह्यातून पाच हजार अभियंते तयार होता, पण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा रोजगार स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नाही. स्टार्टअप, मुद्रा योजनेअंतर्गत बॅंकांकडूनही उद्योग सुरु करण्यासाठी अपेक्षित मदत मिळत नाही, शासकीय योजनांसाठी निधीची मर्यादा असल्याने लाभासाठी वाट पाहावी लागते.

गावपातळीवर शेती, पशुपालनातून रोजगाराची सुविधा आहे, पण त्यातही वारंवार भावात घसरण आणि सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे दोन्ही व्यवसाय परवडत नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव अपेक्षापूर्तीसाठी अनेक तरुण मेट्रोसिटीत जात असल्याचीही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे गुन्हेगारी वाढत असून पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताणही वाढला आहे. तरीदेखील पोलिसांचे मनुष्यबळ ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे आता वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करून शासकीय योजना व त्यांचे बजेट आणि तरुणांसाठी रोजगार निर्मितीचा याचा गांभीर्याने विचार करावाच लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

२०११मधील लोकसंख्या

  • ग्रामीण भाग

  • २९,१८,६६५

  • शहरी भाग

  • १३,९९,०९१

  • एकूण

  • ४३,१७,७५६

२०२३मधील अंदाजे लोकसंख्या

  • ग्रामीण भाग

  • ३४,४७,२००

  • शहरी भाग

  • १६,६०,१५०

  • एकूण

  • ५१,०७,३५०

जिल्हा उद्योग केंद्राद्वारे १.१४ लाख रोजगार

जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून मागील १२ वर्षांत जिल्ह्यातील एक लाख १४ हजार तरुणांना सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांमध्ये रोजगाराची संधी मिळाली आहे. मात्र, लोकसंख्या वाढीच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी असल्याचीही वस्तुस्थिती आहे. उच्च शिक्षणानंतरही स्थानिक पातळीवर सेवा, आयटी, केमिकल अशा क्षेत्रात वाढ झाली नसल्याने तरुणांचे ब्रेनडेड झाले आणि असे तरुण दुसऱ्या शहरांमध्ये स्थलांतर करीत आहेत.

स्मार्ट सिटी झाली, पण विमानसेवा नाही

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात सोलापूर शहराचा समावेश झाला आणि कोट्यवधी रुपयांचा निधीही मिळाला. महामार्गाची कनेक्टिव्हिटी वाढली, पण उद्योगवाढीच्या अनुषंगाने विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी ‘उडान’ योजनेतही सोलापूरचा समावेश झाला. सोलापुरात आयटी, सेवा, केमिकल अशा नवनवीन क्षेत्रांमधील उद्योगांची वाढ होत नसल्याने तरुण स्थलांतर करीत असल्याची विदारक स्थिती असतानाही सोलापूर जिल्ह्यातून विमानसेवा सुरू झाली नाही, हे विशेष.

रोजगारापेक्षा गट, गण वाढीवरच चर्चा

उच्चशिक्षित तरुणांना रोजगार नसल्याने आई-वडिलांना सोडून तरुण हैदराबाद, मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये स्थलांतर करीत आहेत. शासकीय योजनांचे बजेट लोकसंख्येच्या प्रमाणात वाढलेले नाही. अशा गंभीर बाबींवर कमी पण आमच्या तालुक्यात एवढे गट, गण वाढू शकतात, विधानसभा, लोकसभा मतदारसंघ वाढतील का, यावरच अधिक प्रमाणात चर्चा होत असल्याची स्थिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com