तरुणाई सापडली कोरोनाच्या विळख्यात

२० ते ५० वयोगटात ५८ टक्के रुग्ण
corona
coronacorona

मुंबई : राज्यात कोरोना साथीला २१ महिने पूर्ण झाले आहेत. या दरम्यान महाराष्ट्रात ६६ लाख लोक या विषाणूच्या विळख्यात सापडले. त्यापैकी या आजाराचा सर्वाधिक फटका २१ ते ५० वयोगटातील तरुण आणि प्रौढांना बसला आहे. एकूण बाधितांपैकी ५८ टक्के रुग्ण या वयोगटातील आहेत.

राज्यात पहिल्या लाटेनंतर लॉकडाऊन शिथिल केल्यावर तरुण आणि प्रौढ व्यक्ती नोकरी, व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले. धोका असूनही घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबरपर्यंत राज्यातील एकूण बाधितांची संख्या ६६ लाख ७० हजार ४४१ इतकी आहे. त्यापैकी २१ ते ३० वयोगटातील ११ लाख ९३ हजार ४६६, ३१ ते ४० वयोगटातील १४ लाख ८१ हजार ३७४ आणि ४१ ते ५० वयोगटातील ११ लाख ९० हजार १० व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे २१ ते ५० वयोगटातील बाधितांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे चित्र आहे.

२० ते ३९ वयोगटातील लोक हे अधिक लोकांच्या संपर्कात येतात. त्यांच्यामुळे घरातील इतर सदस्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे लसीकरण आणि कोविड नियमांचे पालन करणे फार महत्त्वाचे आहे.

- डॉ. ओम श्रीवास्तव, संसर्गजन्य रोग विशेषज्ञ

corona
PAK vs WI: T20I मध्ये रिझवानची धमाल; गेलचा विक्रम काढला मोडीत

बाधितांमध्ये ११ टक्के मुले

तरुण आणि वृद्धांच्या तुलनेत कोरोनाचा मुलांवर थोड्या प्रमाणात परिणाम झाला आहे, तरीही एकूण संक्रमित रुग्णांपैकी ११ टक्के रुग्ण हे ० ते २० वयोगटातील आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, ० ते १० वयोगटातील दोन लाख १२ हजार ६१७ किशोरवयीन आणि ११ ते २० वर्षे वयोगटातील चार लाख ९७ हजार ४८६ मुलांना या आजाराची लागण झाली.

मुंबईतही ५० टक्के तरुणांना संसर्ग

मुंबईतील एकूण बाधिकांची संख्या ७ लाखांहून अधिक आहे. त्यापैकी २० ते ३९ वयोगटातील चार लाख २ हजार २३ जणांना या विषाणूची लागण झाली; तर ० ते १९ वयोगटातील ५१ हजार ६६३ लहान आणि किशोरवयीन मुलांना बाधा झाली.तरुण आणि वृद्धांच्या तुलनेत कोरोनाचा मुलांवर थोड्या प्रमाणात परिणाम झाला आहे, तरीही एकूण संक्रमित रुग्णांपैकी ११ टक्के रुग्ण हे ० ते २० वयोगटातील आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, ० ते १० वयोगटातील दोन लाख १२ हजार ६१७ किशोरवयीन आणि ११ ते २० वर्षे वयोगटातील चार लाख ९७ हजार ४८६ मुलांना या आजाराची लागण झाली.

corona
वाहन चालवताना मोबाईलवर बोलताय? होणार तब्बल इतका दंड; वाहन कायदा लागू

मुंबईतही ५० टक्के तरुणांना संसर्ग

मुंबईतील एकूण बाधिकांची संख्या ७ लाखांहून अधिक आहे. त्यापैकी २० ते ३९ वयोगटातील चार लाख २ हजार २३ जणांना या विषाणूची लागण झाली; तर ० ते १९ वयोगटातील ५१ हजार ६६३ लहान आणि किशोरवयीन मुलांना बाधा झाली.

corona
राज्यात ओमिक्रॉनचे आणखी 2 रुग्ण; जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबईत ८६ टक्के लसीकरण पूर्ण

कोरोनाविरोधातील लढाईत लसीकरण हेच महत्त्वाचे शस्त्र असून मुंबईत पहिल्या डोसचे प्रमाण १०५ टक्के, तर दुसऱ्या डोसचे प्रमाण ७७ टक्क्यांवर पोहोचले आहे. एकूण लसीकरणात ४५ ते ५९ वयोगटातील नागरिक आघाडीवर आहेत. या वयोगटातील १०३ टक्के नागरिकांना पहिला, तर ८६ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com