Sahyadri Express: खिडकीतून हात घालून पर्स लंपास; प्लॅटफॉर्मवर महिलेचे दागिने हिसकावले, सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा थरार

Sahyadri Express Theft Case: रेल्वे स्थानकावर चोरट्यांनी धाडसी चोरी करत सह्याद्री एक्सप्रेसमधील प्रवाशांना लक्ष्य केले. यामध्ये चोरांनी सोन्याचे दागिने, पैसे आणि मोबाईल हिसकावून चोरटे पसार झाले.
Sahyadri Express

Sahyadri Express

ESakal

Updated on

मिरज : कोल्हापूर-पुणे आणि पुणे-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेसमध्ये शनिवारी मध्यरात्री भिलवडी रेल्वे स्थानकावर चोरट्यांनी धाडसी चोरी करत प्रवाशांना लक्ष्य केले. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर गाडी थांबलेली असताना खिडकीतून हात घालून दोन प्रवाशांच्या पर्स चोरली यामध्ये अंदाजे आठ हजार रुपयेची रोख रक्कम लंपास करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत पुणे कोल्हापूर या गाडीतून पहाटे सव्वातीन वाजता रेल्वेतून उतरलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने, पाच हजारांची रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून चोरटे पसार झाले. या सलग घटनांमुळे सह्याद्री एक्सप्रेसच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com