तर आम्ही शिवसेनेला पाठींबा दिला असता- मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
सोमवार, 31 डिसेंबर 2018

नगरच्या महापौरपदासाठी आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला असता शिवसेनेला पाठिंबा द्यायची आमची तयारी होती पण आमच्याकडे कुणी पाठिंबाच मागितला नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विशेष पत्रकारपरिषदेत दिले. 

मुंबई : नगरच्या महापौरपदासाठी आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला असता शिवसेनेला पाठिंबा द्यायची आमची तयारी होती पण आमच्याकडे कुणी पाठिंबाच मागितला नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विशेष पत्रकारपरिषदेत दिले. 

ऑगस्टा वेस्टलॅन्ड प्रकरणात गांधी परिवारावर शस्त्रास्त्र दलाल मिशेल यांने आरोप केले असून त्याने सोनिया गांधी यांचे नाव घेतले असून कॉंग्रेस पक्षाने व गांधी परिवाराने याचा खुलासा करावा अशी मागणीही फडणवीस यांनी केली. ऑगस्ट वेस्टलॅंड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर चौफेर टीका केली. 

दरम्यान, नगर महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मदत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांवर चौकशी करून पुढील पाच दिवसांत कारवाई करणार असल्याचे संकेत काल (रविवाऱ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले होते. नगरसेवकांनी पक्षादेश झुगारुन भाजपला मदत केली असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले होते. नगरमधील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यक्रमानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी हे स्पष्टीकरण दिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Then We supported the Shiv Sena says Chief Minister