राज्यात सहकारी एवढेच खासगी साखर कारखाने

sugar factory
sugar factoryGoogle

मालेगाव (जि. नाशिक) : राज्यात सहकार क्षेत्राला वेगवेगळ्या कारणांवरून लागलेल्या ग्रहणामुळे या क्षेत्राची अधोगती होत आहे. साखर उद्योगात अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडले आहेत. अवसायनात निघालेले कारखाने खासगी भांडवलदारांनी घेतले आहेत. अलीकडच्या काळात सहकारीऐवजी खासगी कारखाने सुरू होत आहेत. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या गळीत हंगामात सहकारीएवढेच खासगी कारखानेही कार्यरत होते. २०२०-२१ च्या गळीत हंगामात ९५ सहकारी व ९५ खासगी, असे एकूण १९० कारखान्यांच्या चिमणींचा धूर निघाला. (there are 95 co-operative and 95 private sugar factories in the state)

राज्यात साखर उद्योगात सहकार क्षेत्राची पाळेमुळे घट्ट रोवली होती. गैरव्यवहारासह वेगवेगळ्या कारणांमुळे कारखाने बंद पडत गेले. कालांतराने ते अवसायनात निघाले. विक्रीस निघालेले कारखाने खासगी मालकांनी घेतले. राज्यात उसाचे क्षेत्रही वाढत आहे. ऊस वाढत असतानाच सहकारी कारखाने बंद पडत आहेत. नवीन खासगी कारखाने उदयास येत आहेत. राज्यात २०११-१२ मध्ये ७.५६ लाख हेक्टर उसाची लागवड होती. २०१४-१५ मध्ये ती १०.५४ लाख हेक्टरवर पोचली. नंतरच्या दुष्काळाचा फटका बसल्याने २०१६-१७ मध्ये ऊसलागवड ६.३३ लाख हेक्टरपर्यंत खाली घसरली. गेल्या चार वर्षांपासून ऊसलागवडीत वाढ होत आहे. २०२०-२१ मध्ये ऊसलागवडीचे क्षेत्र ११.४२ लाख हेक्टरवर पोचले होते. त्यामुळे साखर कारखान्यांना चांगले भवितव्य आहे.

अमरावती व नागपूर विभागात गेल्या गळीत हंगामात एकही सहकारी साखर कारखाना सुरू नव्हता. कोल्हापूर, पुणे, नगर व औरंगाबाद विभागात खासगीपेक्षा सहकारी साखर कारखान्यांचा वरचष्मा राहिला आहे. सोलापूर विभागात सहकारीच्या दुपटीने खासगी कारखाने या वर्षी कार्यरत होते.

sugar factory
सावधान! नाशिक शहरात डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णांमध्ये वाढ

२०२०-२१ गळीत हंगाम कारखान्यांचा तपशील

विभाग - सहकारी - खासगी - एकूण

कोल्हापूर - २५ - १२ - ३७

पुणे - १८ - १३ - ३१

सोलापूर - १४ - २९ - ४३

नगर - १६- १०- २६

औरंगाबाद - १२ - १० - २२

नांदेड - १० -१६ -२६

अमरावती - ० - २- २

नागपूर - ० - ३ - ३

एकूण - ९५ - ९५ - १९०

sugar factory
नाशिकमधील ‘परिवहन’ची शहर बससेवा होणार इतिहासजमा

राज्यात साखर कारखान्यांची संख्या

- २४६

या वर्षी सुरू झालेले कारखाने

- १९०

सुरू झालेले सहकारी कारखाने

- ९५

सुरू झालेले खासगी कारखाने

- ९५

बंद असलेले कारखाने

- ५६

(there are 95 co-operative and 95 private sugar factories in the state)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com