नाशिकमधील ‘परिवहन’ची शहर बससेवा होणार इतिहासजमा

nashik-city-bus-msrtc-nmc-
nashik-city-bus-msrtc-nmc-Google

पंचवटी (जि. नाशिक) : शहरवासीयांना मोठी उत्सुकता लागून राहिलेल्या नाशिक महापालिकेच्या शहर बससेवेला प्रारंभ होत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना इच्छितस्थळी पोचविणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शहर बस इतिहासजमा होणार आहेत. (city bus service of state transport corporation in Nashik will be closed)

राज्यातील भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महापालिका शहर बस वाहतुकीचे नियोजन करणार असल्याचे सांगितल्यापासून मनपातील सत्ताधारी भाजपकडून या सेवेबाबतच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. त्यानंतर या सेवेसाठी ऑपरेटर्स संस्थेची नेमणूक झाली. आत राज्य परिवहन महामंडळाऐवजी महापालिकेच्या बस शहर-परिसरात धावतील. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पंचवटीतील आडगाव नाका भागातील महामंडळाच्या डेपो क्रमांक दोनमधील शहर बससाठी कार्यरत कर्मचाऱ्यांत भवितव्याचे काय, या भावनेबरोबरच मनपाच्या बसबाबत मोठी उत्सुकताही लागून राहिली आहे.

nashik-city-bus-msrtc-nmc-
नाशिक-गिरणारे रस्त्यावर गंगावाडी भागात बिबट्यांची दहशत

प्रस्ताव दिला : शिरसाट

पंचवटी डेपो व्यवस्थापकांना महामंडळाच्या शहर बसचा उपयोग कोठे करणार, असा प्रश्‍न केला असता, महामंडळाची शहर बससेवा बंद होणार असल्याचे माहिती उपलब्ध आहे; परंतु अधिकाऱ्यांकडून अद्यापही कागदोपत्री काहीच माहिती देण्यात आलेली नसल्याचा खुलासा व्यवस्थापक शुभांगी शिरसाट यांनी केला. शहर बससेवा बंद झाली तरी या बसपैकी काही बस त्र्यंबकेश्‍वर, निफाड, ओझर, घोटी, वाडीवऱ्हे या मार्गावर मागणीनुसार सुरू ठेवण्यासाठी प्रस्ताव दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्याबाबत अद्यापही ठोस निर्णय झाला नाही, असे त्यांनी सांगितले.

महामंडळाच्या महाकार्गोला प्रतिसाद

कोरोनामुळे लावलेल्या निर्बंधांमुळे महामंडळाच्या अनेक बसची चाके जागीच थांबली होती. त्यामुळे महामंडळात कार्यरत चालक, वाहकांसह सर्वांनाच आर्थिक विवंचनेस तोंड द्यावे लागले. शहरातील बससेवेचेही असेच चित्र होते. मात्र, याकाळात महामंडळाने महाकार्गो सेवेच्या माध्यमातून प्रवाशांऐवजी सामानाच्या वाहतुकीस प्राधान्य देत त्याद्वारे भरीव उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून दिला. हा निर्णय चांगलाच सकारात्मक ठरून त्याद्वारे महामंडळाला पंचवटीतील डेपो क्रमांक दोनमधून महिन्यासाठी सहा- सात लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्नही उपलब्ध झाले. याशिवाय जाहिरातीच्या माध्यमातूनही महामंडळाने चांगले उत्पन्न मिळविले.

nashik-city-bus-msrtc-nmc-
नाशिक- कल्याण लोकलचा विषय बारगळला

डेपो दोनमधील एकूण बसची संख्या

ग्रामीण भाग - ४०

शहरी भाग - ९८

एकूण - १३८

कर्मचारी संख्या -

वाहक - ३३६

चालक - २७७

डेपोतील तांत्रिक कर्मचारी संख्या - ८८

(city bus service of state transport corporation in Nashik will be closed)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com