कोरोनाच्या 34 हजार मृतांची नोंदच नाही

कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील जवळपास पावणेदोन लाख व्यक्‍तींचा मृत्यू झाल्याची बाब आता समोर आली आहे. पण, आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत राज्यातील एक लाख 43 हजार 767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे राज्य सरकारने एक लाख 77 हजार 300 लाभार्थींना प्रत्येकी 50 हजारांची मदत वितरीत केली असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.
कोरोना
कोरोनाई सकाळ

सोलापूर : कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील जवळपास पावणेदोन लाख व्यक्‍तींचा मृत्यू झाल्याची बाब आता समोर आली आहे. पण, आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत राज्यातील एक लाख 43 हजार 767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे राज्य सरकारने एक लाख 77 हजार 300 लाभार्थींना प्रत्येकी 50 हजारांची मदत वितरीत केली असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

कोरोना
आजीच्या देखभालीसाठी आली अन्‌ तरुणासोबत पळाली! 16 व्या वर्षी दिला मुलाला जन्म

मार्च 2020 पासून संपूर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना जगातील काही देशांमध्ये आता पुन्हा वाढू लागला आहे. राज्यातील तिन्ही लाटांमध्ये जवळपास पावणेदोन लाखांहून अधिक रुग्ण दगावले आहेत. पण, ज्यांनी शासकीय रुग्णालयांमध्ये विशेषत: कोरोना काळातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये टेस्ट केली आणि त्याठिकाणी ज्यांचा मृत्यू झाला, त्यांचीच नोंद आरोग्य विभागाने ठेवली. त्यामुळे क्‍लिनिकमध्ये टेस्ट केलेले आणि ज्यांना कोरोना नव्हता पण एचआर-सीटी स्कोअर अधिक झाल्याने मृत्यू झाला व कोरोनामुळे घरी मृत्यू झाला, याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या रिपोर्टवरील मृत संख्येच्या पलिकडेही कोरोनाची भयानता किती होती, याची प्रचिती नव्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

कोरोना
31 मार्चपूर्वी घ्या जुन्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र! एप्रिलपासून दुप्पट शुल्क

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार कोरोनामुळे आतापर्यंत एक लाख 43 हजार 767 रुग्ण दगावले आहेत. पण, ज्यांनी खासगी क्‍लिनिकमध्येच टेस्ट केली, ज्यांनी मृत्यूचे रिपोर्टिंग केले नाही, ज्यांचा एचआर-सीटी स्कोअर जास्त असल्याने मृत्यू झाला, त्याची नोंद आमच्याकडे नाही.
- डॉ. अचर्ना गायकवाड, संचालिका, सार्वजनिक आरोग्य

कोरोना
ठिबकसाठी आता 80 टक्‍के सबसिडी! 13 दिवसांत मिळणार अनुदान

कोरोना मृतांची सद्यस्थिती...
आरोग्य विभागाच्या रिपोर्टनुसार
1,43,767
मदत मिळालेले मृतांचे वारसदार
1,60,000
मदतीसाठी पात्र वारसदार
16,300
मदतीसाठी लागलेली रक्‍कम
881.50 कोटी

कोरोना
'एसपी' तेजस्वी सातपुतेंचे ऑपरेशन परिवर्तन! हातभट्टी दारुचे गाव बनले उद्योगगाव

'आधार'वरून आता थेट मदत
राज्य सरकारकडून आतापर्यंत एक लाख 60 हजार लाभार्थींना 50 हजारांची मदत वितरीत झाली आहे. पण, अजूनही साडेसोळा हजार निराधार मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ते शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. त्यातील जवळपास 11 हजार लाभार्थींनी बॅंक खाते क्रमांक चुकीचा दिल्याने त्यांना मदत मिळू शकलेली नाही. आता त्यांना त्यांच्या आधारलिंकवरून दुसऱ्या बॅंक खात्यात मदतीची रक्‍कम वितरीत केली जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे प्रभारी संचालक संजय धारूरकर यांनी दिली. दुसरीकडे सहा हजार 300 लाभार्थींचे अर्ज पात्र ठरले असून त्यांनाही दोन दिवसांत मदत मिळेल, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com