नारायण राणेंच्या प्रवेशाबद्दल माहिती नाही : अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

 नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल माहिती नाही.

- वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचे नुकसान.

मुंबई : नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल माहिती नाही. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचे नुकसान झाले आहे. राज्यातील पराभवाला मी जबाबदार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसला राज्यात फक्त एक जागा जिंकता आली होती. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते. आज दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत असून, या बैठकीत पराभवावर चर्चा होत आहे. अशोक चव्हाण यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची तयारी दर्शविली आहे. काँग्रेसचे माजी नेते नारायण राणे आज सकाळी दिल्लीला रवाना झाले आहेत. यावर बोलताना अशोक चव्हाण यांनी माहिती नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

अशोक चव्हाण म्हणाले, की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची ब टीम आहे. त्यामुळे काँग्रेसला राज्यात मोठे नुकसान झाले. मी या पराभवाची जबाबादारी स्वीकारतो. काँग्रेसच्या पराभवाला फक्त राहुल गांधी जबाबदार कसे? अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे. नागरिकांनी आम्हाला का नाकारले, याची कारणे शोधत आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: there no information about Narayan Rane enters in Congress says Ashok Chavan