अकरावी प्रवेशाच्या असणार पाच फेऱ्या! मुलींसाठी स्वतंत्र पाचवी फेरी; विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रवेश फेरीपूर्वी करता येणार ‘या’ संकेतस्थळावर नावनोंदणी

अकरावी प्रवेशाच्या नियमित तीन फेऱ्या होतील. त्यानंतर ‘ओपन टू ऑल’ची चौथी फेरी आणि मुलींसाठी विशेष पाचवी फेरी असणार आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केवळ दहावीच्या बोर्ड परीक्षेत मिळालेले गुण व अन्य वैयक्तिक माहिती भरून अर्ज करता येईल. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मात्र जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे.
solapur
11th AdmissionEsakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : अकरावी प्रवेशाच्या नियमित तीन फेऱ्या होतील. त्यानंतर ‘ओपन टू ऑल’ची चौथी फेरी आणि मुलींसाठी विशेष पाचवी फेरी असणार आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केवळ दहावीच्या बोर्ड परीक्षेत मिळालेले गुण व अन्य वैयक्तिक माहिती भरून अर्ज करता येईल. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मात्र जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे.

विद्यार्थी सोयीच्या कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी- बारावीला प्रवेश घेऊन ‘नीट’, ‘सीईटी’च्या तयारीसाठी नियमित कोचिंग क्लासला हजेरी लावतात. महाविद्यालयात मात्र ते विद्यार्थी फक्त परीक्षेसाठीच जायचे. अनेक महाविद्यालये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देत होते. हा प्रकार बंद करण्यासाठी मागील वर्षीपासून माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू केली. दरम्यान, आता कोटा प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार २० मे रोजी कनिष्ठ महाविद्यालयांना अकरावीतील रिक्त जागा प्रदर्शित कराव्या लागणार आहेत.

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. विशेष बाब म्हणजे, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी विशिष्ट मुदत नाही. प्रत्येक प्रवेश फेरीपूर्वी विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. याशिवाय केलेल्या अर्जात ऑनलाइन दुरुस्ती देखील करता येणार आहे. प्रत्येक प्रवेश फेरीनंतर त्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम देखील बदलता येणार आहे.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक...

  • २१ ते २२ मे : नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग-१ मधील बदल करणे, विद्यार्थी पसंतीक्रम (१ ते १० कॉलेज) अर्ज भाग-२ भरणे, पसंतीक्रम, गुण व अर्जातील लागू आरक्षणानुसार महाविद्यालयात प्रवेश.

  • २३ ते २६ मे : अलॉटमेंट प्रक्रिया

  • २६ मे : कॅप फेरी-१, पोर्टलवर फेरीसाठी महाविद्यालयांची वाटप यादी प्रसिद्ध, विद्यार्थ्यांच्या लॉगइनमध्ये प्रवेशासाठी वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी प्रसिद्ध करणे, प्रवेशासाठी कट ऑफ यादी प्रसिद्ध करणे.

  • २६ ते २८ मे : वाटप केलेल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’वर क्लिक करावे, कागदपत्रे पडताळणीसाठी त्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे, महाविद्यालय लॉगइनवर प्रवेश निश्चित करणे, नकार किंवा प्रवेश रद्द करणे.

  • २९ मे : महाविद्यालयांमधील रिक्त जागा प्रदर्शित करणे.

  • ३० मे : दुसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे.

  • ३१ मेनंतर : तिसरी, चौथी, पाचवी प्रवेश फेरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com