esakal | लॉकडाउन होणार पण जिल्हाबंदी नाही; आरोग्यमंत्र्यांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Tope

राज्याकडे पुरेसे रेमडेसिव्हिर उपलब्ध आहेत. १ मेनंतर १ लाख रेमडेसिव्हिरची गरज भासू शकते. रेमडेसिव्हिरच्या ७ कंपन्यांच्या मालकांशी बोलणी केली आहे.

लॉकडाउन होणार पण जिल्हाबंदी नाही; आरोग्यमंत्र्यांची माहिती

sakal_logo
By
वृत्तसंस्था

Corona Updates: मुंबई : लॉकडाउनबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे. सर्वांचीच तशी मागणी आहे. मात्र परिस्थिती ओळखून सध्यातरी कडक निर्बंधांचे आदेश दिले आहेत. लॉकडाउन करणं गरजेचं आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच याबाबतची माहिती देतील. जिल्हाबंदी होणार नाही, पण विनाकारण फिरणाऱ्यांना रोखलं जाईल, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यात सध्या ६ लाख ८५ हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी १५ टक्के लोकांना ऑक्सिजनची गरज भासू शकते. आतापर्यंत आपल्याकडे १ हजार ५५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. आम्ही तेच वितरीत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारत सरकार ऑक्सिजनची आयात करेल, याची अपेक्षा आम्ही करत आहोत, असे टोपे म्हणाले.

हेही वाचा: माजी खासदार संजय काकडेंना अटक; गजा मारणे प्रकरण भोवणार

टोपे पुढे म्हणाले की, राज्याकडे पुरेसे रेमडेसिव्हिर उपलब्ध आहेत. १ मेनंतर १ लाख रेमडेसिव्हिरची गरज भासू शकते. रेमडेसिव्हिरच्या ७ कंपन्यांच्या मालकांशी बोलणी केली आहे. त्यांच्याकडे दररोज ६० हजार डोसची मागणी केली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी ऑक्सिजन आणि रॅमडेसिव्हिरचा वापर योग्य प्रकारे करावा. सध्या महाराष्ट्रात १ हजार २५० टन द्रव ऑक्सिजन तयार होत आहे, आणि त्याचा पूर्णपणे वापर फक्त वैद्यकीय कारणासाठी केला जाईल.

हेही वाचा: जम्मू ते केरळ व्हाया महाराष्ट्र; कुठे लॉकडाऊन, कुठे निर्बंध?

टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे, भारतात ३०० मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते. महाराष्ट्रात पेण, थळ अलिबाग, वर्धा, नागपूर आणि बीड आदी ६ ठिकाणी ऑक्सिजनचे उत्पादन घेण्यात येते. मात्र, ते हॉस्पिटलपर्यंत पोहचविण्यासाठी व्यवस्था अपुरी पडत आहे. लिक्विड ऑक्सिजनचा प्रकल्प उभारण्यासाठी वर्ष जाईल, त्यामुळे विविध उत्पादनांसाठी तयार केला जाणारा ऑक्सिजन गरजेनुसार वापरण्यात येणार आहे. ऑक्सिजन प्लांटसाठी तातडीने परवानगी दिली जाईल, यासाठी कोणतीही निविदा काढली जाणार नाही.

loading image