नाशिकमध्ये घर घेण्याच विचार करताय? म्हाडाने तुमच्यासाठी आणलीये 'ही' खास योजना

तेजस वाघमारे - सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे नाशिक व श्रीरामपूर येथील गृहनिर्माण योजनेतील 639 निवासी सदनिका एकरकमी खरेदी पद्धतीने विक्री करण्यासाठी अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

मुंबई : म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे नाशिक व श्रीरामपूर येथील गृहनिर्माण योजनेतील 639 निवासी सदनिका एकरकमी खरेदी पद्धतीने विक्री करण्यासाठी अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर वाटप केल्या जाणाऱ्या या सदनिकांमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी नाशिकमधील मखमलाबाद येथील 83, आडगाव येथील 90, पाथर्डी शिवारातील 95, म्हसरूळ येथील 21 सदनिकांचा समावेश आहे.

मनसेची ठाकरे सरकारवर टीका, म्हणतात...गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना अडचणी

अल्प उत्पन्न गटासाठी नाशिक मधील आडगाव येथे 76, रेल्वे लाईनजवळ पंचक येथे 66 सदनिका आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील बोरावके नगर जवळ टू बीएचकेच्या 77, वन बीएचकेच्या 61 सदनिका व वन आरकेच्या 2 सदनिका उपलब्ध आहेत. अत्यल्प उत्पन्न गटासाठी नाशिक मधील आडगाव येथे वन बीएचकेच्या 67 व वन आरकेची 1सदनिकेचा समावेश आहे.

रामलीलाच्या वेळी सुशांत आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्येच नव्हता म्हणत आदीत्य चोप्रा यांनी केले अनेक मोठे खुलासे.. 

नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या गृहनिर्माण भवन, गडकरी चौक येथील कार्यालयातील मिळकत व्यवस्थापन विभागामध्ये तसेच उपरोक्त योजनांच्या ठिकाणी 20 जुलै पासून अर्ज विक्री सुरू असून याच ठिकाणी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्याचप्रमाणे म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात जनसंपर्क विभाग, कक्ष क्रमांक 20 मध्ये ही अर्ज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी 'म्हाडा'च्या https://mhada.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. योजनेसंबंधित इतर अटी व शर्ती विहित नमुन्यातील अर्जासोबत देण्यात येणार आहेत. अत्यल्प उत्पन्न गटासाठी पाच हजार रुपये, अल्प उत्पन्न गटासाठी दहा हजार रुपये, मध्यम उत्पन्न गटासाठी पंधरा हजार रुपये अनामत रक्कम आकारली जाणार आहे.

-------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thinking of buying a house in Nashik? MHADA has brought this special plan for you