तिसऱ्या लाटेला सुरुवात झालीए; पिकपॉईंट कधी असेल? राजेश टोपेंनी दिलं उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

omicron variant of coronavirus

तिसऱ्या लाटेला सुरुवात झालीए; पिकपॉईंट कधी असेल? राजेश टोपेंनी दिलं उत्तर

मुंबई : राज्यात सध्या कोरोनाच्या लाटेची स्थिती (corona situation) काय आहे? याचा पिकपॉईंट (PickPoint) कधी असेल? असे अनेक प्रश्न सध्या नागरिकांच्या मनात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी या बैठकीतील चर्चेची सविस्तर माहिती दिली. (third wave already started When will be pickpoint Rajesh Tope answered)

हेही वाचा: क्वारंटाईन कालावाधी सगळीकडे सातच दिवसांचा राहिल: राजेश टोपे

टोपे म्हणाले, देशभरात करोनाची तिसरी लाट सुरु झालेली आहे. या लाटेची सर्वोच्च स्थिती कधी असेल हे पहावं लागेल. कालच राज्यात ४५ हजार रुग्णांची नोंद झाली होती, आजही त्यात वाढ होईल. या रोजच्या संख्येचा आकडा केव्हा सर्वोच्चस्थानी जाईल हे पहावं लागेल. दुसऱ्या लाटेमध्ये दररोज सुमारे ६५ हजार रुग्णांची नोंद होत होती तो त्यावेळचा पिकपॉईंट होता, त्यानंतर हा आकडा खाली आला.

हेही वाचा: निर्बंध चांगल्या स्पिरीटने घ्यावेत; आरोग्यमंत्र्यांनी दिली कोरोनाची इत्यंभूत माहिती

पण तिसऱ्या लाटेचा पिकपॉईंट हा दररोज किती लोक पॉझिटिव्ह येतील त्यावर ठरणार आहे, पण याचा आज आंदाज बांधणं शक्य नाही. पण तो कदाचित जानेवारीच्या शेवटापर्यंत येईल त्यांनतर पॉझिटिव्हीटीचा दर खाली जाईल, असं तज्ज्ञांच्या चर्चेतील मत आहे.

क्वारंटाइन कालावाधी सातच दिवसांचा असणार

राज्यात क्वारंटाइन कालावधीबाबत संभ्रम होता. नेमका किती दिवस हा कालावधी असणार यामधील संभ्रम आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दूर केला आहे. त्यांनी म्हटलंय की, संपूर्ण राज्यातील क्वारंटाइनचा कालावधी हा सारखाच असणार आहे. तो सगळीकडेच सात दिवसांचा राहिल. यामध्ये कुठेही कुणालाही सूट नसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top