दुसऱ्या लाटेत 13 जिल्हे हॉटस्पॉट ! वाढले 34.90 लाख रुग्ण

दुसऱ्या लाटेत राज्यातील तेरा जिल्हे हॉटस्पॉट बनले आहेत
Corona
CoronaGoogle
Summary

कोरोनाची दुसरी लाट 10 मार्चपासून सुरू झाली आणि 31 मेपर्यंत राज्यभरात 35 लाख रुग्ण वाढले. 42 हजार 434 रुग्णांचा मृत्यू झाला. 13 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक 25 लाख 68 हजार 690 रुग्ण वाढले तर 27 हजार 522 रुग्णांचा मृत्यू झाला.

सोलापूर : कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट 10 मार्चपासून सुरू झाली आणि 31 मेपर्यंत राज्यभरात 35 लाख रुग्ण वाढले. 42 हजार 434 रुग्णांचा मृत्यू झाला. चिंतेची बाब म्हणजे 13 जिल्ह्यांमधील रुग्णवाढ व मृत्यूदराने राज्य सरकारची झोपच उडविली. सोलापूर (Solapur), मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पुणे (Pune), सातारा (Satara), नगर (Nagar), औरंगाबाद (Aurangabad), नाशिक (Nashik), नागपूर (Nagpur), रायगड (Raigad), सांगली (Sangli), जळगाव (Jalgaon), नांदेड (Nanded) या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक 25 लाख 68 हजार 690 रुग्ण वाढले तर 27 हजार 522 रुग्णांचा मृत्यू झाला. (Thirteen districts in the state have become hotspots in the second wave of corona)

Corona
"तिसऱ्या लाटेपूर्वी 12 ते 18 वयोगटासाठी लसीकरणाचा प्रयत्न !'

पहिल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्या 29 हजारांपर्यंत होती. 24 फेब्रुवारी रोजी सर्वात कमी दोन हजार रुग्ण आढळले. मात्र, 3 मार्चपासून रुग्णवाढ होतानाच 5 मार्चला रुग्णांनी दहा हजारांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर 10 मार्च रोजी 13 हजारांहून अधिक रुग्ण वाढले आणि 18 एप्रिलला रुग्णसंख्या 68 हजार 631 पर्यंत पोचली. 15 एप्रिलपासून कडक निर्बंध लागू केल्यानंतर संसर्ग थांबविण्यासाठी राज्यातील तब्बल एक कोटी 90 लाख संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 35 लाखांहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले तर मृतांची संख्याही चिंताजनक राहिली. चिंतेची बाब म्हणजे, या लाटेतील रुग्णवाढ मागील लाटेच्या तुलनेत तिप्पट होती. त्यामुळे दोन्ही लाटेत ज्या जिल्ह्यांमधील रुग्णवाढ व मृत्यूदर चिंताजनक राहिला, त्या ठिकाणची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे पाऊल राज्य सरकारने उचलले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पातून साडेतीन हजार कोटींची मदत दिली जाणार असल्याची माहिती वित्त विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. तर जिल्हा नियोजन समितीतूनही त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Corona
बापमाणूस! मुलाच्या क्रिकेट मैदानासाठी दिली पाच एकरची द्राक्षबाग

हॉटस्पॉट जिल्ह्यांची स्थिती (10 मार्च ते 31 मे)

  • जिल्हा : रुग्णवाढ - मृत्यू

  • पुणे : 5,88,947 - 4,308

  • मुंबई : 3,67,488 - 3,282

  • नागपूर : 3,24,813 - 3,013

  • ठाणे : 2,74,300 - 2,369

  • नाशिक : 2,51,966 - 2,574

  • सातारा : 1,03,537 - 1,460

  • सोलापूर : 1,01,781 - 2,313

  • नगर : 1,72,301 - 1,930

  • औरंगाबाद : 90,484 - 1,539

  • रायगड : 76,242 - 1,226

  • सांगली : 73,555 - 1,154

  • जळगाव : 70,476 - 834

  • नांदेड 64,710 1,520

तिसऱ्या लाटेपूर्वी आरोग्याची चाचपणी

राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नगर, औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू झाले. तर मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, नगर, नागपूर या आठ जिल्ह्यांमध्ये एक लाखाहून सहा लाखांपर्यंत रुग्ण वाढले. आता तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असल्याने राज्य सरकारने या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याचे नियोजन केले असून त्या ठिकाणच्या आरोग्य यंत्रणेची पडताळणी केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com