Ganesh Festival 2023: तीस वर्षांपूर्वी पुण्यात पहिल्यांदाच झालेला पर्यायी मार्गाचा वापर, असं होतं ९२ सालचे विसर्जन

गेले दहा दिवस राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू होती, तर १९९२ साली कसा झाला होता विसर्जनाचा कार्यक्रम वाचा
Ganesh Festival
Ganesh FestivalEsakal

गेले दहा दिवस राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणरायाच्या आगमनामुळे घराघरात लगबग होती. सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत होती. आज लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत लोक अगदी आनंदात उत्साहात सहभागी झाले आहेत. ढोल ताशांच्या गजरामध्ये गणरायाची मिरवणूकांना सुरूवात झाली आहे.  (Marathi Tajya Batmya)

मुंबईतील मानाच्या राजाच्या मिरणुकीला सुरुवात झाली आहे. तर पुण्यात पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मानाच्या गणपतीची आरती केली. त्यानंतर आता मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मिरवणुकीवेळी भाविकांची मोठी गर्दी होते. कधी- कधी पोलिसांना देखील मध्यस्थी करत गर्दी आवरावी लागते. तर १२ सप्टेंबर १९९२ साली देखील जल्लोषाच्या वातावरणात गणरायाला निरोप देत असताना मिरवणुकीवेळी लाठीमाराचे गालबोट लागले होते. (Latest Marathi News)

Ganesh Festival
Ganesh Festival 2023 : घोड्याच्या टापेखाली साहेब ठार...; असा होता १९६३ सालच्या सार्वजनिक गणेशोत्सव

१२ सप्टेंबर १९९२ साली सार्वजनिक उत्सवातील पदार्पणाची शंभरी गाठलेल्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचा आग्रह धरीत जल्लोषाच्या वातावरणात आज हजारो कार्यकर्त्यांनी निरोप दिला होता. विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना रात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास कराव्या लागलेल्या लाठीमाराच्या प्रसंगाचे गालबोट मात्र या विसर्जन सोहळ्याला लागले. त्यामुळे पहाटे दोन तास मिरवणूक अडून राहिली होती.(Latest Marathi News)

चार रस्त्यांवरून निघालेल्या विसर्जन मिरवणुकांपैकी नेहमीच्या लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणूक साडेसव्वीस तास चालली. एकूण ४२६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला. मिरवणुकीतील शेवटच्या आदर्श मंडळाच्या गणपतीचे मूर्तीचे दुपारी दीड वाजता विसर्जन झाले. मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असणाऱ्या अखिल मंडई मंडळ व श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या गणेशमूर्तीचे सकाळी आठ वाजता विसर्जन झाले, लक्ष्मी रस्त्याने २६३ (त्यांपैकी ९१ विद्युत रोषणाईचे). टिळक रस्त्याने ८१ (त्यापैकी ५२ विद्युत रोषणाईचे) केळकर रस्त्याने ५७ (१८ विद्युत रोषणाईचे) तर कुमठेकर रस्त्याने २५ गणपती विसर्जनास मार्गस्थ झाले.

Ganesh Festival
Ganesh Visarjan 2023: यंदा विक्रम मोडणार ? पुण्यात यावर्षी मिरवणूक किती तास ?

त्यावर्षी मागील वर्षांपेक्षा यंदा मिरवणुकीतील संख्या सुमारे ७० नी आधिक होती. मिरवणूक दोन तास पूर्णपणे थांबूनही पोलिसांनी घेतलेले परिश्रम आणि चार मार्गांचा वापर यामुळे यंदा मिरवणूक गेल्या वर्षापेक्षा पंधरा मिनिटे आधी संपली. शताब्दी निमित्त यावेळी अनेक मंडळांनी नेहमीपेक्षा भव्य रीतीने हा उत्सव साजरा केला. मिरवणुकीतील देखाव्यातही आपले वेगळेपण आणि कल्पनांचे एकत्र ऐश्वर्या प्रकट व्हावे असा त्यांचा प्रयत्न होता. मिरवणूक दोन तास पूर्णपणे थांबूनही पोलिसांनी घेतलेले परिश्रम आणि चार मार्गांचा वापर यामुळे १९९२ साली मिरवणूक गेल्या वर्षापेक्षा पंधरा मिनिटे आधी संपली होती. (Marathi Tajya Batmya)

Ganesh Festival
Rohit Pawar: रोहित पवारांना धक्का! रात्री २ वाजता नोटीस देऊन बारामती ॲग्रोचे दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश

कार्यकर्त्यांच्या आणि लाखो रसिकांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाला वेगळ्या अर्थाने वरून राजांची कृपा लाभली. गणेशोत्सवाच्या गेल्या ११ दिवसात लोकांनी परवा न करता वेळी-अवेळी हजेरी लावून त्रेधातिरपिट उडविणाऱ्या पावसानं काल सकाळपासून मात्र आपलं अस्तित्व अजिबात दाखवलं नाही. त्यामुळे त्यांच्या वर्षावाची धास्ती न बाळगता असंख्य आभाळ वृद्धांनी विविध मंडळाच्या गणेशाचे वैभव डोळ्यात साठविण्यासाठी मिरवणुकीच्या मार्गावर प्रचंड गर्दी केली.(Latest Marathi News)

आपल्या सजावटीचे जास्तीत जास्त लोकांनी कौतुक करावे यासाठी बहुतेक मंडळांना लक्ष्मी रस्त्यानेच मिरवणुकीत भाग घेण्याची इच्छा असते. कारण प्रमुख मंडळाचे गणपती या मार्गाने जात असल्यामुळे नागरिकांची गर्दी प्रामुख्याने त्या ठिकाणी होते. लक्ष्मी रस्त्यावर रांग लावणाऱ्या मंडळांची संख्या वाढू लागल्याने मिरवणूक ठरवलेल्या वेळेत संपणे अवघड होऊ लागले आहे. शिवाय पोलिसांवर ही शिस्त राखण्याच्या दृष्टीने अधिक ताण पडतो.

Ganesh Festival
Hemangi Kavi: "लाज वाटली आणि वाईटही वाटलं", हेमांगी कवीने सांगितला मुख्यमंत्री शिंदेंच्या गणपती दर्शनाचा अनुभव

पर्यायी मार्ग चांगला प्रतिसाद

दरवर्षी भेडसावणारा हा प्रश्न काही प्रमाणात तरी मार्गी लागावा म्हणून मंडळातील टिळक रस्ता केळकर रस्ता आणि कुमठेकर रस्ता या पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले होते. लक्ष्मी रस्त्याच्या बरोबरीनेच टिळक आणि केळकर रस्तास मंडळाचा चांगला प्रतिसाद मिळाला.

कुमठेकर मार्ग मात्र त्यांना सोयीचा नसल्याने त्याचा फारसा वापर झाला नाही. टिळक आणि केळकर रस्त्याने काही प्रमाणात तरी मोठे मंडळ सहभागी झाल्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणुकीवरील ताण बऱ्याच प्रमाणावर कमी झाला. केळकर रस्त्याने मिरवणूक नेणाऱ्या मंडळाचे स्वागत खास पोलीस बँड द्वारे केली जात होती.

गेल्या काही वर्षापासून परिमार्गाचा वापर व्हावा या पोलिसांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आल्याचे जाणवत होते. रात्री साडेदहापर्यंत केळकर रस्त्याने मिरवणूक निघाली. त्यात एकूण 45 मंडळांनी भाग घेतला पोलीस उपयुक्त विक्रम भोके शहर विभाग शहर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त माणिकराव दमानी व फरासखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप शिंदे आणि मिरवणूक केळकर मार्गाने नेण्यास पूर्व भागातील अनेक मंडळांचा कार्यकर्त्यांचे मन वळविले कुमठेकर रस्त्यावरून चौथ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची मिरवणुक निघाली होती, असा उल्लेख सकाळच्या बातमीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com