यंदा होणार अडीच हजार टन आंब्याची निर्यात; पणन मंडळाचे उदिष्ट

यंदाच्या हंगामात अडीच हजार मे. टन आंबा प्रक्रिया करून निर्यात करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
Mango
MangoSakal

पुणे : भारतातून साधारणतः दरवर्षी ५० हजार मेट्रिक टन आंब्याची निर्यात केली जाते. त्यापैकी महाराष्ट्रातून सुमारे ३५ ते ४० हजार मे. टन निर्यात केली जाते. कोरोना साथीनंतर चालू वर्षी आंबा निर्यात वाढावी यादृष्टीने राज्य कृषी पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रांवरील सर्व सुविधा गतिमानतेने कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यंदाच्या हंगामात अडीच हजार मे. टन आंबा प्रक्रिया करून निर्यात करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

हापूस, केशर हा महाराष्ट्रातील, कर्नाटकातील बैंगनपल्ली आणि उत्तर प्रदेशातील दशहरी, चौसा आदी जातींच्या आंब्यांवर प्रक्रिया करून महाराष्ट्रातून आंबा निर्यात होतो. आंबा निर्यातीसाठी पणन मंडळ, अपेडा, कृषी विभागाच्या सहकार्याने भौगोलिक मानांकन प्राप्त आंब्याच्या निर्यातीसाठी सांघिक प्रयत्न सुरू आहेत. पणन मंडळाच्या सुविधांचा वापर करुन अमेरीका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, युरोप, जपान, न्युझीलंड, साऊथ कोरीया, मलेशिया इ. देशांमध्ये आंबा निर्यात होत असतो. यंदा सुमारे अडीच हजार मे. टन आंब्यांवर प्रक्रिया करून निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

Mango Research
Mango ResearchSakal
Mango
२५०० लोकांचा 'हायप्रोफाइल धुलीवंदन इव्हेंट'; रस्त्यावर वाहतूक कोंडी

परदेशी बाजारपेठेमध्ये अत्यंत चांगल्या पॅकिंगमध्ये एकसारखा आंबा निर्यात करणे आवश्यक असते. त्याचबरोबर फळांची प्रत चांगली असणे, फळांवर डाग नसणे, ओरखडे नसणे या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी ९ सुविधा केंद्रांमध्ये विविध प्रक्रिया करून हापूस व केशर आंबा निर्यात केला जातो, असेही त्यांनी सांगितले.

मागील 3-4 वर्षापासुन रशियाला आंबा निर्यातीची सुरवात झालेली आहे. यंदा रशिया-युक्रेन मधील युद्धामुळे रशियाचा स्विफ्ट प्रणालीमधील सेवांबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंध आल्याने निर्यातदारांना आयातदाराकडुन निर्यातीची रक्कम मिळणेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. एकंदरीत युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसत असलेली अस्थिरता आंब्याच्या युरोप व अमेरिका येथील निर्यातीवर विपरीत परिणाम करेल की काय याबाबत निर्यातदार परिस्थितीकडे लक्ष ठेऊन आहेत. परंतु, बहुतांश आंब्याची निर्यात नजीकचे देश, मध्यपुर्व आशियाई देश येथे होत असल्याने एकुण निर्यातीमध्ये फारसा फरक पडणार नाही असे चित्र दिसते.

- सुनिल पवार, कार्यकारी संचालक, राज्य कृषी पणन मंडळ.

Mango
पुणे : मुलीसोबतचे मैत्रीसंबंध तोडण्यास सांगत तरुणाचा खून

आयातदार देशांच्या मागणीनुसार आंब्यावर कराव्या लागणाऱ्या विविध प्रक्रिया

- व्हेपर हिट ट्रिटमेंट -

व्हेपर हिट ट्रिटमेंट या सुविधेमध्ये आंब्यांमधील फळमाशीचे निर्मूलन करण्यासाठी उष्ण वाष्प प्रक्रिया केली जाते. आंबा अशा प्रक्रियेत पन्नास मिनिटे ठेवला जातो. तसेच आंबा दक्षिण कोरिया देशास निर्यात करताना व्हेपर हिट प्रक्रियेत ५२ अंश सेल्सियस तापमानाला ३ मिनिटांची गरम पाण्याची प्रक्रिया करावी लागते.

- हॉट वॉटर ट्रीटमेंट -

फळमाशी निर्मूलनासाठी या सुविधेचा वापर केलेल्या आंब्यांची प्रामुख्याने युरोप, दक्षिण कोरिया, रशिया, मॉरिशियस, चीन या देशांना आंबा निर्यात होते. त्यामध्ये आंब्याला ४८ अंश सेल्सियस तापमानातील पाण्यात ६० मिनिटांसाठीची प्रक्रिया करावी लागते.

- विकिरण सुविधा -

या सुविधेद्वारे आंब्यांमधील कोय किडा आणि फळमाशीचे निर्मूलन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित विकिरण सुविधा वापरली जाते. आंब्याला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया येथे आंबा निर्यात करताना विकिरण प्रक्रियेत ५२ अंश सेल्सियस तापमानात ३ मिनिटांची गरम पाण्याची प्रक्रिया करावी लागते.

भारतातून या देशात होतो आंबा निर्यात

अमेरीका, रशिया, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, अर्जेंटीना, इंग्लंड, जपान, न्युझीलंड, दक्षीण कोरीया. मॉरिशस, ईराण, मध्यपुर्व आशियाई देश, युरोप मधील देश

पणन मंडळाचे आंबा प्रक्रिया करून निर्यात उदिष्ट

देश - मेट्रिक टन

  • - जपान - 50 मे.टन

  • - दक्षिण कोरीया - 50 मे.टन

  • - युरोपीयन - 1100 मे.टन

  • - इतर देशांसाठी- 200 मे.टन

  • - अमेरीका 1000 मे. टन

  • - ऑस्ट्रेलिया – 200 मे. टन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com