२५०० लोकांचा 'हायप्रोफाइल धुलीवंदन इव्हेंट'; रस्त्यावर वाहतूक कोंडी

हवेली पोलीस मात्र कारवाईकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
वाहतूक कोंडी
वाहतूक कोंडीSakal

किरकटवाडी: सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल ॲक्वॅरिअस मध्ये तब्बल अडीच हजारांपेक्षा जास्त तरुण-तरुणींचा एकत्रित हाय प्रोफाईल धुलीवंदन इव्हेंट आयोजित करण्यात आलेला आहे. हॉटेल समोर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाचशे ते आठशे मीटर पर्यंत या इव्हेंट मध्ये सहभागी असलेल्या तरुण-तरुणींची दुचाकी व चारचाकी वाहने उभी करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना व इतर पर्यटकांना ये-जा करताना अडथळा निर्माण होताना दिसत आहे. हवेली पोलीस मात्र कारवाईकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

एका बाजूला खडकवासला धरणाचे पावित्र्य राखण्यासाठी विविध सामाजिक संघटनांचे स्वयंसेवक भर उन्हात खडा पहारा देत आहेत तर दुसरीकडे धरणाच्या अगदी पाण्याला लागून हजारो तरुण तरुणी या हॉटेलमध्ये डिजेच्या तालावर बिनधास्तपणे रंग खेळत आहेत. ज्या ठिकाणी हा इव्हेंट आयोजित करण्यात आलेला आहे त्याला पाटबंधारे विभागाने अतिक्रमण केल्याची नोटीसही बजावलेली आहे मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. या इव्हेंट मधील लाखो लिटर रंग मिश्रीत पाणी हे सरळ धरणाच्या पाण्यात मिसळणार आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमाला योग्य खातरजमा न करता हवेली पोलीसांनी परवाणगी दिलीच कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे.

वाहतूक कोंडी
पुणे : किर्लोस्कर वसुंधरा राम नदी महोत्सवाचे आयोजन

याबाबत हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रस्त्यावर थांबलेल्या सर्व वाहनांवर कारवाई केल्याचे सांगितले, मात्र वाहतूक पोलीस प्रविण ताकवणे यांना याबाबत विचारले असता त्यांनी अगोदर दहा वाहनांवर कारवाई केली असल्याचे सांगितले तर लगेच पुन्हा साठ वाहनांचे फोटो काढलेले असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र हजारो वाहने रस्त्यावर उभी आहेत.

"कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यात आलेली आहे. कार्यक्रमासाठी किती लोक जमतील याबाबत काही माहिती नाही. रस्त्यावर लावण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई केली आहे." सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे,पुणे ग्रामीण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com