esakal | Maharashtra : 'विस्मा'च्या अध्यक्षपदी ठोंबरे, उपाध्यक्षपदी रोहित पवार!
sakal

बोलून बातमी शोधा

'विस्मा'च्या अध्यक्षपदी ठोंबरे, उपाध्यक्षपदी रोहित पवार!
'विस्मा'च्या अध्यक्षपदी ठोंबरे, उपाध्यक्षपदी रोहित पवार!

'विस्मा'च्या अध्यक्षपदी ठोंबरे, उपाध्यक्षपदी रोहित पवार!

sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर (सोलापूर) : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (West Indian Sugar Mills Association - WISMA) अध्यक्षपदी नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे (Thombare) यांची तर उपाध्यक्षपदी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची पुढील तीन वर्षांकरिता सर्वानुमते निवड झाली आहे. या संघटनेच्या महासचिवपदी श्रीनाथ म्हस्कोबा (Shrinath Mhaskoba) कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत (Pandurang Raut) यांना संधी मिळाली आहे. खास निमंत्रित म्हणून विठ्ठल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांची निवड झाली आहे.

हेही वाचा: पवारांच्या गृहप्रवेशाने कोठेंचा पक्षप्रवेश! ठरली महापालिकेची रणनीती

'विस्मा' ही महाराष्ट्रातील खासगी साखर कारखान्यांची शिखर संस्था आहे. या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची 2021-2024 या कालावधीकरिता त्रैवार्षिक निवडणूक झाली. यामध्ये 11 सदस्य बिनविरोध निवडून आले. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने विस्माच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व महासचिव पदाच्या सर्वानुमते निवडी केल्या. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने साखर उद्योगातील तज्ज्ञ म्हणून आमदार हरिभाऊ बागडे व रेणुका शुगर्सचे अध्यक्ष रवी गुप्ता यांनी एकमताने निवड केली आहे.

अन्य सदस्य : माधवराव घाटगे (अध्यक्ष, गुरुदत्त शुगर्स), योगेश पाटील (कार्यकारी संचालक,अ थणी शुगर्स), रोहित नारा (संचालक, सद्‌गुरू श्री श्री साखर कारखाना), यशवंत डहाके (अध्यक्ष, पराग ऍग्रो फुड्‌स अँड अलाईड), रणजित मुळे (कार्यकारी संचालक, गंगामाई इंडस्ट्रीज), महेश देशमुख (अध्यक्ष, लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज), बजरंग सोनवणे (अध्यक्ष, येडेश्वरी ऍग्रो प्रॉडक्‍ट्‌स), समय बनसोड (संचालक, मानस ऍग्रो इंडस्ट्रीज)

loading image
go to top