Prithviraj Chavan: धक्कादायक! भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य; कारवाईच्या मागणीनंतर माजी मुख्यमंत्र्यांना धमकी

भिडेंवर कारवाई करण्याच्या मागणीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanEsakal
Updated on

कऱ्हाड : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना अधिवेशनात अटक करण्याची मागणी करणाऱ्या माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना आज ईमेल द्वारे अनोळख्या व्यक्तीने धमकी दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आमदार चव्हाण यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

मेल करणारा संशयीत नांदेडचा असल्याच्या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. त्याला नांदेडमधूम ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथकही रवाना झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. आमदार चव्हाण यांच्या निवासस्थानी पोलिस अधीक्षक समीर शेख भेट देणार आहेत.

पावसाळी अधिवेशनात आमदार चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या आक्रमक भूमिकेनंतर त्याचे पडसादही उमटले आहेत. त्यानंतर आज चव्हाण यांना पाटण कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी अनोळखी व्यक्ताची फोन आला. त्यात त्याने धमकी दिलीच त्याशिवाय मेलद्वारे त्यांना धमकी देण्यात आली आहे.

घटनेनंतर त्यांच्या खळबळ उडाली आहे. आमदार चव्हाण यांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. मेल करणारा संशयीत नांदेड येथील असल्याची खात्री पोलिसांनी केली आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथकही रवाना झाले आहे.

Prithviraj Chavan
Sanjay Shirsat : दिघेसाहेबांचा घातपातच म्हणत ठाकरेंवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?

'संभाजी भिडे यांनी अमरावतीमध्ये राष्ट्रपित्याबाबत अनुदार उद्‍गार काढून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रपित्याबाबत वाईट टिपणी करणे संपूर्ण देशासाठी लाजिरवाणे असून सरकारने आजच बंदोबस्त करून त्यांना अटक करावी,’’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल विधानसभेत केली होती.

Prithviraj Chavan
Sambhaji Bhide Controversy : भिडेंविरोधात राज्यभरात संतापाची लाट; वाशिममध्ये जाण्यासाठी बदलावा लागला मार्ग कारण....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Karad Krishna Sugar Factory election latest updates
Ashok Chavan
Pune TDR Dispute Sparks Reaction as Actress Usha Chavan Returns Honour
Ravindra Chavan
Marathi News Esakal
www.esakal.com