Wed, March 22, 2023

Accident: पेण खोपोली मार्गावर भीषण अपघात; ३ प्रवासी ठार
Published on : 19 February 2023, 1:55 pm
देशभरात सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह सुरू आहे. अशातच भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. या अपघातात ३ प्रवासी ठार झाले आहेत.
रायगडमधील पेण खोपोली मार्गावर वाक्रुळ गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये तीन प्रवासी जागीच ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्याला सुरूवात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमधील पेण खोपोली मार्गावर वाक्रुळ गावाजवळ इको कारचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातानंतर महामार्गावर गाड्यांची मोठी गर्दी झाली आहे.
प्रवाशांच्या मदतीने अपघातग्रस्तांना मदत करण्याचे काम सुरु आहे. या भीषण धडकेत लाल रंगाच्या इक्को गाडीचा चक्काचूर झाला आहे.