esakal | 'या' तीन मुस्लिम नेत्यांनी, काँग्रेस-शिवसेनेला आणले जवळ
sakal

बोलून बातमी शोधा

three muslim leaders bring congress shiv sena together

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले असून, यावर उद्या (शुक्रवार) अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. हिंदुत्त्व आणि धर्मनिरपेक्ष अशी भूमिका असलेली हे पक्ष एकत्र येत असून, या पक्षांना एकत्र आणण्यात तिन्ही पक्षातील मुस्लिम नेत्यांचा मोलाचा वाटा आहे हे स्पष्ट झाले आहे.

'या' तीन मुस्लिम नेत्यांनी, काँग्रेस-शिवसेनेला आणले जवळ

sakal_logo
By
सिद्धेश्‍वर डुकरे

मुंबई : राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले असून, यावर उद्या (शुक्रवार) अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. हिंदुत्त्व आणि धर्मनिरपेक्ष अशी भूमिका असलेली हे पक्ष एकत्र येत असून, या पक्षांना एकत्र आणण्यात तिन्ही पक्षातील मुस्लिम नेत्यांचा मोलाचा वाटा आहे हे स्पष्ट झाले आहे.

बातम्यांसाठी डाऊनलोड करा सकाळचे एप

दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाल्यानंतर उद्या मुंबईत शिवसेनेशी बैठक होणार आहे. त्यानंतर सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित होणार आहे. पण, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येणार हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार या तीन मुस्लिम नेत्यांचा यांना एकत्र आणण्यात मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. त्याला कारणेही तसेच आहेत. या तीन मुस्लिम नेत्यांना पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस या तीन पक्षांनी अल्पसंख्याक समाजाला आपलंसं करण्यासाठी एक वेगळा संदेश देण्याची रणनीती आखली होती. यामध्ये हे तिन्ही पक्ष यशस्वी झाले आहेत.

वंचित आघाडीला मोठा धक्का; आंबेडकर बाहेर

मुळचे काँग्रेसचे असलेले आणि शिवसेनेत गेलेल्या अब्दुल सत्तार यांचा काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि प्रमुख नेत्यांशी संपर्क आहे. त्याचा फायदा शिवसेनेला अधिक झाला. तर, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई निकाल लागल्यापासून भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आम्ही कोणासोबतही जाण्यास तयार असल्याचे म्हटले होते. त्यांनी त्यासाठी मातोश्रीही गाठली होती. आता दलवाई यांचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. तर, राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना राष्ट्रवादीने आपली भूमिका मांडण्याचे पूर्ण अधिकार दिले होते. त्यामुळे नवाब मलिक चर्चेच्या फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते. या तिन्ही मुस्लिम नेत्यांमुळे वेगवेगळ्या विचारसरणी असलेले पक्ष एकत्र आलेले दिसत आहेत.

मुठा नदीत सापडलेल्या बॅगेत आढळला मृतदेह

महाराष्ट्रात पाच वर्षे सरकार टिकण्यासाठी किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली असून, महाविकासआघाडी ही उदयास आले आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार हे निश्चित झाले असून, संजय राऊत यांनी सुरवातीपासून शिवतीर्थावर शपथविधी होणार हे सांगत होते. आता तसेच होताना दिसत आहे. या तिन्ही पक्षांमध्ये 15-15-12 असा सत्ताफॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. आता उद्याच या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे. हे सर्व शक्य झाले आहे, फक्त तीन मुस्लिम नेत्यांमुळे हे मात्र स्पष्ट आहे.