मुंबईत कस्तुरबा, KEM तर पुण्यात बी.जे.मध्ये उद्यापासून सुरु होणार नव्या कोरोना टेस्टिंग लॅब्स

मुंबईत कस्तुरबा, KEM तर पुण्यात बी.जे.मध्ये उद्यापासून सुरु होणार नव्या कोरोना टेस्टिंग लॅब्स

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारकडून केंद्राच्या नियमावलीनुसार विविध पावलं उचलली जातायत. अशात आज महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी NIV म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला देखील भेट दिली. यानंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

महाराष्ट्रात उद्यापासून तीन नवीन कोरोना टेस्टिंग लॅब्स सुरु होणार असल्याची घोषणा राजेश टोपे यांनी दिली. यासचसोबत येत्या ८ ते १० दिवसात राज्यात एकूण ८ नव्या कोरोना टेस्टिंग लॅब्स सुरु होणार आहेत असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलंय. या लॅब्सच्या मार्फत प्रत्येक लॅबमधून दररोज २०० ते २५० कोरोना सॅम्पल्स टेस्ट केले जाऊ शकतील.

महाराष्ट्रात उद्यापासून सुरु होणाऱ्या तीन टेस्टिंग लॅब्स हा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय, मुंबईतील KEM रुग्णालय आणि पुण्यातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयात सुरु करण्यात येणार आहेत. या सर्व टेस्टिंग लॅब्ससाठी लागणारी उपकरणं आणि कोरोना टेस्टिंगसाठी लागणारे किट्स देखील केंद्राकडून पुरवण्यात येणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. 

कोरोनाला स्टेज २ मध्येच रोखण्यासाठी महाराष्ट्र सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलंय. अशात सरकारकडून १० लाख टेस्टिंग किट्सची ऑर्डर देण्यात आल्याचं देखील राजेश टोपे यांनी माध्यमांना सांगितलंय. पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी NIV मध्ये चोवीस तास मेहनतीने काम करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचं देखील कौतुक केलंय. 

three new covid19 testing lasb will start from tomorrow health minister rajesh tope shared infromation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com