
ठाणे : विधान परिषदेसाठी हाती आलेल्या एका जागेसाठी शिवसेनेचे तीन ठाणेकर इच्छुक आहेत. या तिन्ही इच्छुकांना विधान परिषदेचे आश्वासन देण्यात आल्याने या पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यामध्ये शिवसेना सचिव आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू संजय मोरे, माजी आमदार रवींद्र फाटक यांचा समावेश आहे.