Harshwardhan Sapkal : कामगार शोषणव्यवस्था संपविण्याची गरज

कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan SapkalSakal
Updated on

मुंबई - ‘कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आउट सोर्सिंग’ व कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाते. यातून शोषणाचे प्रमाण वाढत आहे. हे शोषण फक्त शहरात होत नाही तर ते गावखेड्यापर्यंत पोहचले आहे.

शोषणावर आधारित ही व्यवस्था संपविण्याची गरज आहे. त्यासाठी भविष्यातील संकटे ओळखून संघटित लढा द्या,’ असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या राज्यस्तरीय संमेलनात ते म्हणाले की, अनेक उद्योग बंद पडत आहे आणि जे आहेत त्यात व्यापारी फक्त नफ्यासाठी काम करत आहेत. त्यांना कामगारांच्या कल्याणाचे काहीही देणेघेणे नाही. मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणांमुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे तर गरीब अधिक गरीब होत चालला पण पंतप्रधानांना गरिबांची चिंता नाही.

मोठी चळवळ उभी करा

मोदी सरकारचा कारभार म्हणजे ‘दाल में कुछ काला’ नाही तर अख्खी डाळच काळी आहे. त्यांची नियत खोटी आहे आणि नीती तर नाहीच. अशा शक्तीविरोधात लढायचे आहे. ‘नाही रे’ वर्गासाठी लढले पाहिजे, कामगारांचे शोषण होत असताना आपण शांत बसून चालणार नाही, कृती कार्यक्रम घेऊन काम करा, मोठी चळवळ उभी करा आणि एकत्र येऊन लढा द्या, असे सपकाळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com