इच्छुक उमेदवार
इच्छुक उमेदवार sakal media

अपक्षांच्या मनधरणीसाठी प्रमुख उमेदवारांची दमछाक! सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघात तब्बल २८० इच्छुक अपक्ष मैदानात; कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार? वाचा...

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुती, मनसे, वंचित बहुजन आघाडीसह अन्य पक्षांशिवाय तब्बल २८० इच्छुक अपक्ष मैदानात आहेत. त्यांची मनधरणी करून आपल्या विजयातील अडसर दूर करण्याचा प्रयत्न प्रमुख उमेदवारांकडून सुरु आहे. त्यासाठी त्यांची दमछाक होत असल्याची स्थिती आहे.
Published on

सोलापूर : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुती, मनसे, वंचित बहुजन आघाडीसह अन्य पक्षांशिवाय तब्बल २८० इच्छुक अपक्ष मैदानात आहेत. त्यांची मनधरणी करून आपल्या विजयातील अडसर दूर करण्याचा प्रयत्न प्रमुख उमेदवारांकडून सुरु आहे. त्यासाठी त्यांची दमछाक होत असल्याची स्थिती आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, मनसे, वंचित बहुजन विकास आघाडी, बहुजन समाज पार्टी, प्रहार, रासप, बहुजन महा पार्टी, न्यू राष्ट्रीय समाज पार्टी, भारतीय युवा जन एकता पार्टी, महाराष्ट्र लोकहितवादी पार्टी, अखिल भारतीय सेना अशा विविध पक्षांचे उमेदवार उभे आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवारांची संख्याही खूप मोठी आहे. महायुती व महाविकास आघाडीतील प्रमुख उमेदवारांनी आपली मते ज्या अपक्ष उमेदवाराला पडू शकतात व त्यामुळे आपल्या विजयासाठी त्याची उमेदवारी अडचणीची ठरू शकते, त्यांची मनधरणी करायला सुरवात केली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. तोपर्यंत त्यांना अर्ज माघार घेण्यासाठी विनंती करणे सुरु आहे. याशिवाय त्यांच्या गाठीभेटीदेखील वाढल्या असून जे उमेदवार आपल्या सांगण्यावरून अर्ज मागे घेवू शकत नाही, त्यांना त्यांच्याच जवळील व्यक्तीकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता ४ नोव्हेंबरपर्यंत ३३५ उमेदवारांपैकी कितीजण आपला अर्ज मागे घेतात आणि निवडणुकीला प्रत्यक्षात किती उमेदवार सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतदारसंघनिहाय उमेदवार

  • मतदारसंघ एकूण उमेदवार

  • बार्शी ३१

  • माढा ३१

  • करमाळा ३१

  • मोहोळ २७

  • उत्तर सोलापूर २६

  • शहर मध्य ३९

  • अक्कलकोट १५

  • द. सोलापूर ४०

  • पंढरपूर ३८

  • सांगोला ३२

  • माळशिरस २५

  • एकूण ३३५

पाच मतदारसंघात रस्सीखेच

जिल्ह्यातील ११ मतदारसंघापैकी दक्षिण सोलापूर मतदारसंघात सर्वाधिक ४० उमेदवार रिंगणात आहेत. त्यात दिलीप माने, धर्मराज काडादी, महादेव कोगनुरे यांचे कडवे आव्हान महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर असणार आहे. पण, अर्ज माघारीनंतर या मतदारसंघाचा अंदाज येवू शकेल. दुसरीकडे शहर उत्तर, शहर मध्य, पंढरपूर-मंगळवेढा, सांगोला, करमाळा, बार्शी व माढा येथेही अपक्षांची संख्या २०हून अधिक आहे. त्यामुळे त्यातील अधिकाधिक उमेदवार कसे अर्ज मागे घेतील, यासाठी राज्यस्तरावरून देखील प्रयत्न सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com