Sharad Pawar Resigns : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद देखील सोडणार, पवारांनी केला निवडणूक लढवण्याबद्दल मोठा खुलासा

Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. शरद पवार आता कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत. तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर निवृत्त होणार, असल्याची मोठी घोषणा शरद पवार यांनी केली आहे. यापुढे तीनच वर्षे राजकारणात राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येईल. ही नवीन समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृत कार्यकर्ते नाराज झाले होते. यावेळी आम्ही देखील राजकारणात सक्रिय राहणार नाही, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या निवृत्ती घेण्याच्या निर्णयाला मोठा विरोध होत आहे.

काय म्हणाले शरद पवार -

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनीक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपूर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नामध्ये अधिकाधीक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही.

सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० ते १ मे, २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिल.

शरद पवार पुढे काय करणार?

आपणास माहित आहे कि माझा अनेक स्वयंसेवी संस्थाच्या कामकाजामध्ये सहभाग आहे. रयत शिक्षण संस्था (सातारा), विद्या प्रतिष्ठान (बारामती), मराठा मंदीर (मुंबई), महात्मा गांधी सर्वोदय संघ ( उरळी काचन, पुणे), शिवनगर विद्या प्रसारक मंडळ ( बारामती), अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद (पुणे) ह्या संस्थामधून साडेचार लाखाहून अधिक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेतात. तसेच मुंबई शहरामध्ये वैज्ञानिक क्षेत्राला प्रोत्साहित करणारे नेहरू सेंटर, महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांसंबंधी अभ्यास करणारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान वाचन संस्कृतीला प्रोत्साहित करणारी काही लाख ग्रंथाचे संवर्धन करणारी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संस्था, पुणे जिल्ह्यातील मांजरी बु. येथील ऊस व साखरकारखानदारी क्षेत्रात संशोधन विस्तार कार्य करणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यासारख्या अनेक संस्थाची मी जबाबदारी सांभाळत आहे व माझे योगदान देत आहे. ह्या कार्यावर यापुढे मी अधिक लक्ष देणार आहे.

गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले हे मी विसरू शकत नाही.. परंतू यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्य अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्याची एक समिती गठीत करावी असे मी सुचवू इच्छितो.

समितीत खालीलप्रमाणे सदस्य असावेत-

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी सी चोको, अजित पवार, जयंत पाटील, श्रीमती सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनील देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच इतर सदस्य असतील.

Sharad Pawar
Lok Maze Sangati: 'लोक माझे सांगाती'च्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन; शरद पवारांच्या आत्मचरित्रातून अनेक खुलासे

इतर सदस्य -

श्रीमती फौजिया खान, अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, श्री. धीरज शर्मा, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कु. सोनिया दूहन, अध्यक्षा, राष्ट्रवादी युक्ती कॉंग्रेस आणि अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस.

मी अध्यक्षपदावरून जरी निवृत्त होत असलो तरी...

ही समिती अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेईल आणि पक्ष संघटना वाढीसाठी पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी, जनसेवेसाठी सातत्याने झटत राहिल असा मी विश्वास व्यक्त करतो.

माझ्या सहकान्यांनो, मी अध्यक्षपदावरून जरी निवृत्त होत असलो तरी माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही. मी साठ दशकांहून अधिक काळ जनमाणसांत काम करीत आलो आहे, त्या सेवेत कुठलाही खंड पडणार नाही. उलट सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी पुणे, बारामती, मुंबई, दिल्ली अथवा कुठेही असू आपणा सर्वांसाठी नेहमीप्रमाणे भल्या सकाळपासून उपलब्ध राहिल. जनतेच्या अडीअडचणी प्रश्न यांच्या सोडवणूकीसाठी अहोरात्र कष्ट घेत राहिल.

'सततचा प्रवास हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मी आपल्या भेटीसाठी सार्वजनिक कार्यक्रम, सभा समारंभाना येत राहिल. आपणाशी संवाद साधण्यासाठी, आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी, आपली गाऱ्हाणी ऐकण्यासाठी आणि सरकारकडे मांडण्यासाठी माझी पायपीट अविरतपणे चालू राहिल. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे. त्यामुळे आपणापासून कोणतीही फारकत नाही. मी आपणासोबत होतो आहे व शेवटच्या वासापर्यंत कायम राहणार त्यामुळे भेटत राहू, धन्यवाद.

Sharad Pawar
Sharad Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीला कार्यकर्त्यांचा विरोध! घोषणाबाजीनं दणाणून सोडलं सभागृह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com