Lok Maze Sangati: 'लोक माझे सांगाती'च्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन; शरद पवारांच्या आत्मचरित्रातून अनेक खुलासे

शरद पवारांच्या आत्मचरित्रातून आणखी नवे काय खुलासे होतात याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.
Lok Maze Sangati_Sharad Pawar
Lok Maze Sangati_Sharad Pawar

मुंबई : महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन नुकतचं यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलं. यावेळी शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, अरुण गुजराथी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पवारांनी आपल्या या आत्मचरित्रातून महाविकास आघाडीसह नंतरच्या राजकीय घडामोडींवरही यात भाष्य करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळं या पुस्तकाकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Release of Sharad Pawar autobiography Lok Maze Sangati second part many big revelations out)

Lok Maze Sangati_Sharad Pawar
Ajit Pawar on TDM: हे दुर्दैव, सिनेमाला लवकरात लवकर.. TDM साठी अजित पवारांनी दिला आदेश

या पुस्तकात २०१९ मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापण्यासाठी केलेला पहाटेचा शपथविधी. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना आणि सरकारमधील कारभार यांवरही या पुस्तकातून भाष्य करण्यात आलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी परिस्थिती कशी हाताळली याबाबत या पुस्तकात भाष्य करण्यात आलं आहे.

Lok Maze Sangati_Sharad Pawar
Ajit Pawar on TDM: हे दुर्दैव, सिनेमाला लवकरात लवकर.. TDM साठी अजित पवारांनी दिला आदेश

शरद पवार यावेळी आपल्या राजकीय आठवणींमध्ये रमले. ते म्हणाले, पहिल्यांदा लोकांनी वाचायला शिकलं पाहिजे, व्यक्ती वाचन हे तुमच्या सर्वांच्या ज्ञानात भर टाकणार असेल. माझे वडील बंधू आप्पासाहेब पवार नगरच्या प्रवरा साखर कारखाण्यात कृषी अधिकारी होते. त्यांनी मला नगरला बोलावून रयत शिक्षण संस्थेसोबत काम करण्यास सांगितलं. १ मे १९६० रोजी माझी सार्वजनिक ६३ वर्षे पूर्ण झाली. त्यातील ५८ वर्षे मी राजकारणात राहिलो यानंतर आता केवळ तीन वर्षे राहिली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com