‘गो गॅस’ आता राज्यभरात उपलब्ध | Go Gas | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Go Gas
‘गो गॅस’ आता राज्यभरात उपलब्ध

‘गो गॅस’ आता राज्यभरात उपलब्ध

पुणे - स्वयंपाकासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅस (LPG Gas) पुरविणाऱ्या ‘गो गॅस’ने (Go Gas) आता संपूर्ण राज्यात वितरकांचे जाळे तयार केले आहे. त्यामुळे आता सर्वत्र हा गॅस उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कंपनीच्या व्यवस्थापनाने दिली आहे.

कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड ही एनएसईमधील सूचीबद्ध कंपनी आहे. घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी कंपनीतर्फे सिलिंडर पुरविण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक घर आणि व्यावसायापर्यंत सेवा पुरविण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला आहे. ग्राहकांना नजीकच्या वितरकाकडे सिलिंडर उपलब्ध होण्यासाठी वितरकांचे जाळे अधिक सक्षम केल्याचे कंपनीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

नेहमी नावीन्यपूर्ण धोरणे आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीमुळे देशातील सर्वांत वेगाने वाढणारी आणि खासगी क्षेत्रातील आघाडीची संस्था बनण्याचा कंपनीचा मानस आहे. नवीन ग्राहकांसह वितरकांनाही सामावून घेण्याची प्रक्रिया चालू आहे. देशभरात ५८ एलपीजी बॉटलिंग प्लांट, २०९ ऑटो एलपीजी स्टेशन आहेत, कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडला एमडीआरएद्वारे उत्कृष्ट कंपनी रेटिंग दिले आहे. अधिक माहितीसाठी www.gogas.co या वेबसाइटला भेट देऊ शकता.

टॅग्स :maharashtragas