मोई येथे ‘एक गाव, एक शिवजयंती’
Sakal

मोई येथे ‘एक गाव, एक शिवजयंती’

बोरी बुद्रुक येथे मोटारसायकलवरुन जाणाऱ्या दांपत्यावर बिबट्याने हल्ला केला यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असल्याची घटना घडली.
Summary

बोरी बुद्रुक येथे मोटारसायकलवरुन जाणाऱ्या दांपत्यावर बिबट्याने हल्ला केला यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असल्याची घटना घडली.

- राजेश कणसे

आळेफाटा - बोरी बुद्रुक येथे मोटारसायकलवरुन जाणाऱ्या दांपत्यावर (Couple) बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केला यामध्ये महिला गंभीर जखमी (Injured) झाली असल्याची घटना मंगळवारी ( दि २१) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बोरी बुद्रुक ( ता. जुन्नर) येथील शिंदे मळयामधील दत्तात्रय शिंदे आणि त्यांच्या पत्नी हौसाबाई शिंदे हे दोघेजण त्यांच्या मोटारसायकलवरुन बोरी बुद्रुक गावामधून घराकडे जात असताणा रस्त्यावरच असलेले सिद्धेश्वर मंदिरावजवळ त्यांची मोटारसायकल आली असता बाजुच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मोटारसायकलवर हल्ला करुन हौसाबाई शिंदे यांच्या पायाला चावा घेतला. त्याच दरम्यान त्यांच्या मोटारसायकलच्या पाठीमागून एक चारचाकी वाहन आल्यामुळे बिबट्या तेथून पसार झाला.

मोई येथे ‘एक गाव, एक शिवजयंती’
खडकवासला कालव्यात सोडले जातेय सांडपाणी; कचऱ्याचेही ढीग

या घटनेत हौसाबाई शिंदे यांच्या पायाला बिबट्याचे तिन दात लागल्यामुळे त्या जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनखात्याचे अधिकारी संतोष साळूंके वनरक्षक भालेराव बिबट रेस्क्यू टिमचे सदस्य ऋषी गायवाड यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमी झालेल्या हौसाबाई शिंदे यांना उपचारासाठी आळे येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु त्या ठिकाणी लस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना जुन्नरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरु आहेत.

दरम्यान, आळेफाटा परीसरातील आळे, बोरी बुद्रुक, साळवाडी, जाधववाडी, राजुरी, उंचखडक या गावांमध्ये ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असुन, या परीसरात बिबटयाचे प्रमाण जास्त असुन त्यांना त्यांचे खाद्य मिळत नसल्याने ते मानवी वस्तीवर येऊन पाळीव प्राण्यांवर सातत्याने हल्ले करत आहेत. असाच एक हल्ला पंधरा दिवसांपूर्वी वडगाव आनंद या ठिकाणी एका युवकांवर झाला होता सुदैवाने यातुन तो थोडक्यात बचावला मोटारसायकलस्वारांवरही हल्ले होत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com