राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक कोविड पॉझिटिव्ह दर २० टक्क्यांपेक्षा जास्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona patient
राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक कोविड पॉझिटिव्ह दर २० टक्क्यांपेक्षा जास्त

राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक कोविड पॉझिटिव्ह दर २० टक्क्यांपेक्षा जास्त

मुंबई - मुंबईसह राज्यात (Maharashtra) कोविड रुग्णांची (Covid Patient) संख्या कमी झाली असली तरी राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) सरासरीपेक्षा जास्त आहे. सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असलेल्या जिल्ह्यांत नाशिकचा (Nashik) क्रमांक पहिला आहे. नाशिकमध्ये सर्वाधिक ३८.९८ टक्के, त्यापाठोपाठ पुण्यात ३८.५४ टक्के, रायगड ३०.६१ टक्के, अकोला ३०.२२ टक्के, नांदेड २७.७५ टक्के, वर्धा २७.७१ टक्के, ठाणे २७.०७ टक्के, नागपूर २५.६८ टक्के, सांगली २४.९४ टक्के, सिंधुदुर्ग २३.५६ टक्के एवढा पॉझिटिव्हिटी दर आहे. जो राज्याच्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दरापेक्षा जास्त आहे.

सध्या राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर २३.४८ टक्के एवढा आहे. जो १६ जानेवारीपर्यंत २२.९ टक्के एवढा होता. राज्याच्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दराहून कमी असलेल्या जिल्ह्यांत मुंबईसह २५ जिल्ह्यांचा समावेश आहे. २५ जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी दर एक अंकी असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. ही दिलासादायक बाब असून उर्वरित फक्त दहा जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी दर अधिक असल्याचे समोर येत आहे. यावरून कोरोनाची तिसरी लाट हळूहळू काढता पाय घेत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. मात्र यासाठी आगामी एक ते दोन आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगत राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

हेही वाचा: Video: बछड्याला नेताना मादी बिबट्या कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ

मुंबईत ७ जानेवारी रोजी २०,९७१ इतकी सर्वाधिक नोंद झाल्यानंतर, २३ जानेवारी रोजी मुंबईतील दैनंदिन रुग्ण हळूहळू २,५५० पर्यंत घसरले आहेत. त्यानुसार मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर १३.२ टक्के वर घसरला आहे. यासह कोल्हापूर, सोलापूर, सातारा, लातूर, नंदूरबार, धुळे, रत्नागिरी, उस्मानाबाद आदी २५ जिल्ह्यांत राज्याच्या पॉझिटिव्हिटी दरापेक्षा कमी म्हणजेच २० टक्क्यांपर्यंत आहे. कोरोनाला उतरती कळा यावर बोलताना राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी सांगितले की, कोरोनाला उतरती कळा सुरू झाली असून मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्याही कमी आहे. अवघ्या आठवडाभरात मुंबई, पालघर, ठाणे यांसारख्या जिल्ह्यातील प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. सर्वांत आधी लाट मुंबईत सुरू झाली असून या ठिकाणी आधी घट सुरू झाली असल्याचे डॉ. आवटे म्हणाले.

एक अंकी पॉझिटिव्हिटी दर जिल्हा टक्केवारी : जालना ९.०९, हिंगोली ८.१०, बुलढाणा ७.४१, बीड ६.८८, परभणी ५.५९

पुढील आठवड्यात रुग्ण आणखी वाढू शकतात; पण सक्रिय रुग्णांपैकी केवळ ३.५ % रुग्णांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता आहे. उर्वरित होम क्वारंटाईन आहेत. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top