esakal | जाणून घ्या तीन मिनटात आजच्या टॉप १० न्यूज; पाहा व्हिडीओ
sakal

बोलून बातमी शोधा

Pocket News

सकाळच्या पॉकेट अपडेट्समध्ये आपण जाणून घेणार आहोत, आताच्या टॉप टेन न्यूज...

जाणून घ्या तीन मिनटात आजच्या टॉप १० न्यूज; पाहा व्हिडीओ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

महाराष्ट्र:

सकाळच्या पॉकेट अपडेट्समध्ये आपण जाणून घेणार आहोत, आताच्या टॉप टेन न्यूज...

पाहा व्हिडीओ:


पाहा व्हिडीओ: 


1.२३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा खुल्या केल्या जाणारेत. नियमावलीनुसार राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीये. 

2.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांत नव्या रोजगारांच्या संधी तब्बल ६० टक्‍क्‍यांनी घटल्यात. या स्थितीतही रोजगार वाढत चाललेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात ३२२७ नवे रोजगार निर्माण झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिलीये.

3. वाहतूक पोलिसांवरील होणारे हल्ले वाढलेत. याच पार्श्वभूमीवर या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी.. वाहन चालकाचा परवाना रद्द करणारी तरतूद... मोटार वाहन कायद्यात करण्यात येणारंय. तसेच पोलिसांना बॉडी कॅमेरेही देण्यात येणारेत. मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती देण्यात आलीये.

4. अमेरिकेत काळा-गोरा भेदभाव करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना पराभवाला सामोरे जावे लागतंय. जो जनतेत भेद करतो त्याचा पराभव निश्‍चित होतो. हे बदलाचे चक्र जगात सुरू आहे. त्यामुळे भारतात सुद्धा हा बदल झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिलाय.

5. भारताच्या दूरसंचार विभागाने आयटी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय. बीपीओ आणि वर्क फ्रॉम होमबाबत कोरोनाकाळात देण्यात आलेली सूट आता कायमस्वरुपी लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आलंय.

6. आरक्षणामुळे आपण चांगले मित्र गमावत चाललोय. एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चाललाय, याचं फार वाईट वाटतंय, अशी खंत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलीये.

7. व्हॉट्सअपला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) यूपीआयवर येण्याची परवानगी दिलीये. त्यामुले आता WhatsAppच्या E-wallet वरूनही पैसे पाठवता येणारेत.

8. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना आपला पराभव दिसू लागल्याने ते अनेक खोटे आरोप करु लागलेत. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प खोटे आरोप आणि चुकीची माहिती देत असताना अनेक टीव्ही वाहिन्यांनी त्यांचे लाईव्ह कव्हरेज थांबवल्याचा प्रकार अमेरिकेत घडलाय. 

9. जॉर्जिया-मिशीगनची कायदेशीर लढाई डोनाल्ड ट्रम्प हारलेत. मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्याची मागणी करत ट्रम्प यांनी कोर्टात धाव घेतली होती. पण, ट्रम्प यांची याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. ज्यो बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.

10. प्रख्यात गायिका ब्रिटनी स्पिअर्सने आपल्या वडिलांवर गंभीर आरोप केलेत. ब्रिटनीने वडिलांवर फसवणूकीचे आरोप लावलेत. वडील जेमी स्पिअर्स यांनी तिची संपत्ती लाटण्याचा प्रयत्न केल्याचं तिने म्हटलंय. 
 

loading image