"भाजीपाल्याचे दर वाढल्याने ज्यांना त्रास होतो त्यांनी पाहा, काळजावर दगड ठेवावा लागतो"

पुणे हवामान विभागाच्या प्रमुखांनी मार्मिक ट्वीट केलं आहे.
Farmer Life
Farmer LifeSakal

सध्या भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहे. टोमॅटोने तर प्रती किलो १५० पेक्षा जास्त भावाचा टप्पा गाठला आहे त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पण ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून हा माल येतो त्यांच्या कष्टाकडे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. खतांचे, बियाणांचे, औषधांचे भाव वाढले त्याबद्दल कुणी कधीच तक्रार करत नाही पण भाजीपाल्याचे भाव वाढले की त्याच्या बातम्या होतात हे विशेष.

शेतकऱ्यांना खूप कष्टाने पीक घ्यावं लागतं. घेतलेलं पीकही अवकाळी, नैसर्गिक आपत्तीमुळे व्यवस्थित येईल का याबद्दल शाश्वती नसते. एवढा खर्च करून, कष्ट करून जर पीक चांगलं आलं तर त्याला बाजारात भाव मिळेल का याचीही कल्पना नसते. कधीतरीच शेतकऱ्यांना आपल्या पिकाला चांगला भाव मिळतो. त्यातूनच त्याला थोडाफार पैसा मिळत असतो. पण सध्या भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे अनेकजण त्रस्त आहेत.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्वीटरवरून एक फोटो शेअर केला आहे. "भाजीपाल्याचे दर वाढल्यावर ज्यांना त्रास होतो ना, त्यांनी पहावं, शेती कामं सोपं नाही... काळजावर दगड ठेवावा लागतो." असं मार्मिक ट्वीट त्यांनी केलं आहे.

त्यांनी शेअर केलेल्या फोटमध्ये एक चिमुकलं बाळ मिरचीच्या शेतात शांत झोपलं असून त्याच्या अंगावर आईने स्कार्फ टाकलं असून त्याचे आईवडील शेतात काम करताना दिसत आहेत. ट्वीटवरील या फोटोवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, उत्तर भारतात पाऊस पडत असून दक्षिण भारतात मान्सूनने अजून समाधानकारकपणे हजेरी लावली नाही. त्यामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न घटले असून बाजारातील आवक कमी झाली आहे. यामुळेच भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोचेही भाव गगनाला भिडले असून पाऊस वेळेवर पडला नाही तर अजूनही भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com