Toor Dal Rates
Toor Dal RatesSakal

Toor Dal Rates: तूरडाळीचे भाव पुन्हा गगनाला! 3 महिन्यांत 22% वाढ, दर आणखी वाढण्याची शक्यता

मार्च 2023 च्या तिमाहीत तूर डाळीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

Toor Dal Rates: मार्च 2023 च्या तिमाहीत तूर डाळीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. देशांतर्गत पुरवठा कमी झाल्यामुळे तूर डाळीच्या किंमती आणखी वाढू शकतात. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि शेतकरी सोयाबीन, कापूस या पिकांकडे वळत असल्याने उत्पादनात 20-30% घट होऊ शकते.

तूर डाळीचा पुरेसा साठा नसल्याने चिंता वाढली आहे. गेल्या तीन महिन्यांत तूर डाळीच्या किंमतीत 22 टक्क्यांनी वाढ झाल्याचे उद्योग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या एका वर्षात तूर डाळीच्या किंमतीत 32% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

8,400-8,500 रुपये प्रतिक्विंटलच्या पातळीवर भाव :

तूरडाळीचे सर्वात मोठे उत्पादक असलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख घाऊक बाजारात गिरणी-गुणवत्तेची तूर डाळ 8400-8500 रुपये प्रति क्विंटल दराने व्यापार करत आहे. त्याच वेळी, त्याची किमान आधारभूत किंमत 6,600 रुपये प्रति क्विंटल आहे.

अकोल्याच्या राधा उद्योगाचे नरेश बियाणी म्हणतात, “ऑक्टोबरमधील पावसामुळे महाराष्ट्रात तूर पिकाचे नुकसान झाले, ज्यामुळे उत्पादनात 20% घट होऊ शकते. याचा थेट परिणाम यंदाच्या एकूण उत्पादनावर होणार आहे.''

Toor Dal Rates
Akshaya Tritiya 2023: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोफत मिळतेय सोन्याचे नाणे; जाणून घ्या

किंमती 10% पर्यंत वाढू शकतात :

ओरिगो कमोडिटीज इंडिया या कृषी तंत्रज्ञान कंपनीचे कृषी संशोधन प्रमुख तरुण सत्संगी म्हणतात, “तूरडाळीची किंमत आणखी 8-10% वाढू शकते आणि जुलै-ऑगस्टपर्यंत 9,300-9,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचू शकते.

जुलै-ऑगस्टपर्यंत मान्सूनच्या पावसाबाबत स्पष्टता येईल. एल निनोचा मान्सून आणि पुढच्या वर्षीच्या खरीप पेरणीवर कसा परिणाम होतो यावर किंमतीतील वाढ अवलंबून असेल.

काही दिवसांपूर्वीच राज्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, बाजरी, गहू, डाळी आणि कडधान्यांच्या पिकांना फटका बसला असल्यामुळे या पिकांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीही जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्वारीचे दर 22 ते 29 रुपयांवरुन 28 ते 50 रुपयांपर्यंत गेले आहेत.

Toor Dal Rates
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com