मुंबईत राहणं धोकादायकच; पाच वर्षांत कोसळल्या 2700 इमारती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 July 2019

मुंबई : मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जात असून सुरक्षित शहर अशी देखील मुंबईची ओळख आहे.असं असलं तरी गेल्या साडे पाच वर्षात मुंबईत इमारती कोसळून तब्बल 234 लोकांचा बळी तर 840 जण जखमी झाल्याची माहिती आरटीआय मधून समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी आपत्कालीन व्यस्थापन विभागाला 2013 पासून 2018 पर्यंत मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना,दुर्घटनेतील बळी आणि जखमी याबाबतची माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यस्थापन विभागाचे ही माहिती दिलेली आहे.

या माहितीप्रमाणे सन 2013 पासून जुलै 2018 पर्यंत मुंबईत एकूण 2704 इमारती कोसळून तब्बल 234 लोकांची बळी 840 जखमी झाले आहेत.

2013
एकूण 531 इमारतीचा कोसळण्याच्या घटना घडल्या असून दुर्घटनेत एकूण 101 लोकांचा  मृत्यू झाला असून त्यात 58 पुरुष आणि 43 स्त्रियांचा समावेश आहे तर एकूण 183 लोक जखमी झाले असून त्यात 110 पुरुष आणि 73 स्त्रियांचा समावेश आहे.

2014
एकूण 343 इमारती कोसळण्याच्या दुर्घटनेत एकूण 21 लोकांचा  मृत्यू झाला असून त्यात 17 पुरुष आणि 4 स्त्रियांचा समावेश आहे तर एकूण 100 लोक जखमी झाले असून त्यात 62 पुरुष आणि 38 स्त्रियांचा समावेश आहे.

2015
एकूण 417 इमारती कोसळण्याच्या दुर्घटनेत एकूण 15 लोकांचा  मृत्यू झाला असून त्यात 11 पुरुष आणि 4 स्त्रियांचा समावेश आहे तर एकूण 120 लोक जखमी झाले असून त्यात 79 पुरुष आणि 41 स्त्रियांचा समावेश आहे.

2016
एकूण 486 इमारती कोसळण्याच्या दुर्घटनेत एकूण 24 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 17 पुरुष आणि 7 स्त्रियांचा समावेश आहे. तर एकूण 171 लोक जखमी झाले असून त्यात 113 पुरुष आणि 59 स्त्रियांचा समावेश आहे.

2017
एकूण 568 इमारती कोसळण्याच्या दुर्घटनेत एकूण 66 लोकांची मृत्यू झाला असून त्यात 44 पुरुष आणि 22 स्त्रियांचा समावेश आहे तर एकूण 165 लोक जखमी झाले असून त्यात 101 पुरुष आणि 64 स्त्रियांचा समावेश आहे.

2018
जुलैपर्यंत एकूण 359 इमारती कोसळण्याच्या दुर्घटनेत एकूण 7 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 5 पुरुष आणि 2 स्त्रियांचा समावेश आहे तर एकूण 100 लोक जखमी झाले असून त्यात 73 पुरुष आणि 27 स्त्रियांचा समावेश आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Total 2704 buildings collapsed in Mumbai during last five years