सोलापूर शहरात वाहतूक पोलिसांची कारवाई! ‘या’ चालकांकडील वाहने होणार जप्त; वाहनचालकाकडे असावीत ‘ही’ कागदपत्रे, वाचा...

सोलापूर शहर वाहतूक पोलिसांकडून दररोज बेशिस्त वाहनांवर कारवाई सुरू आहे. एक हवालदार दररोज किमान ३० वाहनांवर दंडात्मक कारवाई करतो. यावेळी वाहनाची कागदपत्रे नाहीत, लायसन्स देखील नाही, अशांकडील वाहन जप्त केले जात आहे. याशिवाय नंबरप्लेट नाही, चालक मद्यपान केलेला आहे, वाहतूक नियम मोडून देखील वाहन चालक अंमलदारासोबत अरेरावी, हुज्जत घालत आहे, अशांची देखील वाहने जप्त केली जाणार असल्याचे वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
traffic police (file photo)
traffic police (file photo)esakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहर वाहतूक पोलिसांकडून दररोज बेशिस्त वाहनांवर कारवाई सुरू आहे. एक हवालदार दररोज किमान ३० वाहनांवर दंडात्मक कारवाई करतो. यावेळी वाहनाची कागदपत्रे नाहीत, लायसन्स देखील नाही, अशांकडील वाहन जप्त केले जात आहे. याशिवाय नंबरप्लेट नाही, चालक मद्यपान केलेला आहे, वाहतूक नियम मोडून देखील वाहन चालक अंमलदारासोबत अरेरावी, हुज्जत घालत आहे, अशांची देखील वाहने जप्त केली जाणार असल्याचे वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सोलापूर शहर वाहतूक पोलिस दरवर्षी दोन लाखांहून अधिक बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई करतात. कारवाईसाठी वाहतूक शाखेच्या दक्षिण व उत्तर विभागाकडील प्रत्येकी २५ हवालदारांकडे ई-चालान मशिन देण्यात आली आहे. मशिन कमी असल्याने आणखी ५० मशिन मागविण्यात आल्याचे सहायक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी सांगितले. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी वाहन अडविल्यास वाहनाचा विमा (इन्शुरन्स), पीयूसी, लायसन्स, आरसी बुक अशी कागदपत्रे असल्यास त्यांना सोडून दिले जाते.

जप्त केलेली वाहने जेलरोड पोलिस ठाण्याच्या आवारात (वाहतूक शाखेच्या मुख्य कार्यालयाजवळ) आणून लावली जात आहेत. वाहतूक पोलिस कारवाई करताना अनेकदा वाहनचालक अरेरावीची भाषा वापरतो. ‘हा अधिकारी माझा मामा, काका, भाऊ आहे; तो पदाधिकारी माझ्या ओळखीचा आहे, आम्ही त्याचे कार्यकर्ते आहोत’, असे सांगून ते हुज्जत घालतात. त्यांच्याकडील वाहने जप्त करून त्यांचे खटले न्यायालयात पाठविले जातील, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

वाहतूक नियम सर्वांनी पाळावेत

शहर वाहतूक शाखेच्या वतीने बेशिस्त वाहनांवर दररोज दंडात्मक कारवाई केली जात आहे. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन देऊ नये, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन मोठा दंड भरावा लागू शकतो. दुसरीकडे, वाहनधारकांनी वाहनाची कागदपत्रे जवळ ठेवावीत, वाहनास ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट असावी.

- सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर

‘ई-चालान’मध्येच फोटो बंधनकारक

वाहतूक नियम मोडलेल्या वाहनावर ‘ई-चालान’ मशिनद्वारेच दंडात्मक कारवाई करणे बंधनकारक आहे. वाहतूक अंमलदारांना त्यांच्या स्वत:च्या मोबाईलमध्ये बेशिस्त वाहनांचे फोटो काढून त्यावरून दंडात्मक कारवाई करता येत नाही. विशेष बाब म्हणजे, हवालदार दर्जाच्या अंमलदारालाच त्या मशिनद्वारे बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाईचा अधिकार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Missing Link Safety Risk
Police Name Plate Misuse
solapur city crime branch action
HSRP number plate
Marathi News Esakal
www.esakal.com