गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत तेलंगणात गोदावरी नदीत एकाच कुटुंबातील ६ मुलं बुडाल्याची घटना घडलीय. एका लग्नासाठी ही मुलं आली होती. त्यावेळी ते नदीत अंघोळीसाठी उतरले पण पाण्याचा अंदाज न आल्यानं ६ जण पाण्यात बुडाले. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. तेलंगणा पोलीस आणि स्थानिकांकडून रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. मात्र ते सापडले नसल्याची माहिती समजते.