Infant Death
sakal
नागपूर - राज्यातील अर्भक, उपजत व बालमृत्यू आणि माता मृत्यू रोखण्यासाठी शासन कोट्यवधींचा खर्च करते. यानंतरही मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. महाराष्ट्रात एप्रिल २०२२ ते २०२५ या चार वर्षांच्या कालावधीत ४३ हजार ६६२ अर्भक (० ते १ वर्ष) आणि ७ हजार ३८५ बालकांचा (१ ते ५ वर्ष) मृत्यू झाला असल्याचे वास्तव पुढे आले आहे. राज्यात जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२५ या काळात ५९९ माता मृत्यूंची नोंद झाली आहे.