राज्यातील आरएफओंच्या जम्बो बदल्या  

राजेश रामपूरकर
Tuesday, 11 August 2020

सेमिनरी हिल्स येथील वन परिक्षेत्र अधिकारी विजय गंगावने यांची बदली फिरते पथक नागपूर येथे तर हिगणा येथील वन परिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांची पदस्थापना अवैध शिकार प्रतिबंधक पथक नागपूर येथे झाली आहे. मात्र, या दोन्ही जागा रिक्त असून या जागेवरील पदस्थापनेसाठी रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा वन विभागात आहे. 

 
नागपूर  ः राज्यातील ११९ वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश आज मुख्यालयात धडकले. त्यात सेमिनरी हिल्स येथील वन परिक्षेत्र अधिकारी विजय गंगावने यांची बदली फिरते पथक नागपूर येथे तर हिगणा येथील वन परिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांची पदस्थापना अवैध शिकार प्रतिबंधक पथक नागपूर येथे झाली आहे. मात्र, या दोन्ही जागा रिक्त असून या जागेवरील पदस्थापनेसाठी रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा वन विभागात आहे. 

बाप रे बाप, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी साप !

नियुक्तीच्या ठिकाणी हजर न होता बदलीसाठी दबाव निर्माण करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे बदलीच्या आदेशात म्हटले आहे. तळोदी येथील वन परिक्षेत्र अधिकारी अभिलाषा सोनटक्के हीची बदली गोरेवाडा प्रकल्प येथे झाली. अधिकाऱ्याचे नाव (कंसात बदली झालेले ठिकाण) अनिल भानूदास भगत (एसटीपीएफ पेंच व्याघ्र प्रकल्प), आरती रमेश ठाकरे (पेंच व्याघ्र प्रकल्प, कुही), शालिनी महादेव शिरपूरकर (पारशिवनी, प्रादेशिक), जितेंद्र ठाले (सामाजिक वनीकरण, नरखेड), सागर बनसोड (भिवापूर). 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfer of 119 RfO In State