भारतीय वनसेवेतील ५३ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Transfer of 53 IFS Officers
Transfer of 53 IFS Officers

नागपूर, :  भारतीय वन सेवेतील ५३ वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश आज मुख्यालयात धडकले. त्यात मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांची पदोन्नतीनंतर सामाजिक वनीकरण अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक पुणे येथील मुख्यालयात तर ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांची पदोन्नतीनंतर मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक चंद्रपूर येथे पदस्थापना झाली.

१४ उप वनसंरक्षकांची वन संरक्षकपदी पदोन्नती झाली आहे. तर विभागीय वनाधिकारी उत्तम सावंत यांची भारतीय वनसेवेतील नियुक्तीनंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प उपसंचालक कऱ्हाड तर नंदकिशोर काळे यांची बदली उपसंचालक ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प (गाभा क्षेत्र), एस बी. भलावी यांची पदस्थापना उपवनसंरक्षक कार्यआयोजना चंद्रपूर येथे झाली आहे. 

अधिकाऱ्यांची नावे (कंसात बदली झालेले ठिकाण) मुख्य वनसंरक्षक अ.ना. खडसे (मुख्य महाव्यवस्थापक (औषधी वनस्पती, एफडीसीएम), एस. रामाराव (मुख्य वनसंरक्षक (प्रा.) यवतमाळ), ए.एस.कळसकर (सदस्य सचिव प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नागपूर), आर.के. वानखेडे (मुख्य वनसंरक्षक शिक्षण व प्रशिक्षण, पुणे), एस.डी. दोडल (मुख्य वनसंरक्षक (प्रा.) पुणे), अरविंद आपटे (मुख्य वनसंरक्षक, मंत्रालय महसूल व वन विभाग, मुंबई), एन.बी. गुदगे (मुख्य वनसंरक्षक (प्रा) नाशिक), एस.एम. गुजर (वनसंरक्षक संशोधन पुणे), जी. मल्लिकार्जुन (वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली), एस. युवराज (वनसंरक्षक नियोजन व्यवस्थापन वन्यजीव नागपूर), एस. रमेशकुमार (वनसंरक्षक वन्यजीव पुणे), डॉ. जितेंद्र रामगावकर (वनसंरक्षक, क्षेत्र संचालक ताडोबा- अंधारी प्रकल्प), डॉ. किशोर मानकर (वनसंरक्षक सामाजिक वनीकरण नागपूर), पी.टी. मारणकर (प्रादेशिक व्यवस्थापक एफडीसीएम,नाशिक), डी. डब्ल्यू. पगार (वनसंरक्षक (प्रा) धुळे), एन.एस. लडकत (वनसंरक्षक कार्यआयोजना, पुणे), एस.पी. वडस्कर (वनसंरक्षक मूल्यांकन, नागपूर), एस.एस. माळी (वनसंरक्षक, कार्यआयोजना पूर्व, नागपूर), एस.बी. हिंगे (वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण औरंगाबाद), ए.श्रीलक्ष्मी (उपवनसंरक्षक, मानव संसाधन व्यवस्थापन, नागपूर), मनीषकुमार (उपवनसंरक्षक, अर्थसंकल्प नियोजन व विकास, नागपूर), केशव वाबळे (उपवनसंरक्षक (प्रा) यवतमाळ), गिन्नी सिंह (विभागीय वनाधिकारी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव, नागपूर), अरविंद मुंडे (उपवनसंरक्षक. चांदा), के.एम. अभर्णा (संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली, चंद्रपूर), के. डब्ल्यू. धामगे (उपवनसंरक्षक, कार्यआयोजना, यवतमाळ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com