राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे पुण्याच्या सह आयुक्तपदी

शनिवार, 18 मे 2019

-  रविंद्र शिसवे पुण्याचे नवे पोलिस सह आयुक्त.

मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली.

महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज जारी करण्यात आले. पांडे, शिसवे यांच्यासह नवल बजाज यांची मुंबईत सह पोलिस आयुक्तपदी (प्रशासन) बदली झाली. सुरेश मेकला यांची ठाणे शहराच्या सह आयुक्तपदी तर निकेत कौशिक यांच्याकडे पोलिस महानिरीक्षकपदाचा (कोकण विभाग) कार्यभार सोपविण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfer of IPS Police Officers Ravindra Shivse will be the JCP Pune